S M L

...जेव्हा रॉजर फेडरर होतो जगातला पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज

चक्क विंबल्डनमध्ये दाखवले आपले क्रिकेट कौशल्य

Updated On: Jul 11, 2018 09:38 AM IST

...जेव्हा रॉजर फेडरर होतो जगातला पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज

आतापर्यंत आपण क्रिकेटमध्ये अशा अनेक फलंदाजांना आणि गोलंदाजांना नंबर एकचा खेळाडू झालेले पाहिले असेल. पण तुम्ही कधी टेनिसपटूला क्रिकेटमध्ये नंबर एकचा खेळाडू होताना पाहिले आहे का? कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल पण हे खरंय. जगातला सर्वोत्कृष्ट टेनिसपटू म्हणून रॉजर फेडररकडे पाहिले जाते. पण आता त्याला आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये 1 नंबरचा फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Loading...
Loading...

विंबल्डनच्या चौथ्या फेरीत रॉजर फ्रान्सच्या एड्रियान मेनारिनोविरोधात खेळत होता. या सामन्यात रॉजरने अचानक फॉरवर्ड डिफेन्स शॉट लगावला. विंबल्डनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. यात आयसीसीला टॅग करत तुम्ही फेडररच्या या कौशल्याकडे कसे पाहतात हा प्रश्नही विचारण्यात आला. विंबल्डनच्या या ट्विटला उत्तर देत आयसीसीनेही त्याला सर्वोत्तम फलंदाज असे म्हटले.

जागतीक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला रॉजर विंबल्डनच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. फेडररने एड्रियानचा 6-0, 7-5, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना एक तास 45 मिनिटांपर्यंत चालला. पुढील सामन्यात फेडरर फ्रान्सचा गेल मोनफिल्स आणि दक्षिण आफ्रिकेचा के केविन एण्डरसन यांच्यात होणाऱ्या विजेत्याशी खेळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2018 09:38 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close