• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • तू सर्वात Cute नाहीस असं सांगत रितिकानं मागितली रोहितची माफी!

तू सर्वात Cute नाहीस असं सांगत रितिकानं मागितली रोहितची माफी!

रोहित शर्माची (Rohit Sharma) पत्नी रितिकानं (Ritika Sacjdeh) त्याची सोशल मीडियावर (Social Media) माफी मागितली आहे. रोहित शर्मापेक्षा देखील गोड कुणीतरी आपल्याला भेटल्याचा दावा रितिकानं केला आहे.

 • Share this:
  लंडन, 30 जून : टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) यांची जोडी फॅन्समध्ये सुपरहिट आहे. हे दोघं सध्या लंडनमध्ये सुट्टी साजरी करत आहेत. त्यांची मुलगी समायरा देखील सुट्टीमध्ये मजा करत आहे. या सुट्टीच्या दरम्यान रोहितची पत्नी रितिकानं त्याची सोशल मीडियावर (Social Media) माफी मागितली आहे. रोहित शर्मापेक्षा देखील गोड कुणीतरी आपल्याला भेटल्याचा दावा रितिकानं केला आहे. रितिका प्रमाणेच रोहितनं देखील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो पत्नी रितिकासोबत आहे. तसंच मुलगी समायराचे काही गोड फोटोही रोहितनं शेअर केले आहेत. टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील त्याच्या परिवारासोबत रोहित आणि रितिकासह सुट्टी एकत्र साजरा करत आहे. रितिकानं तिच्या इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहलंय, “सॉरी रोहित, तू आता सेटवरील सर्वात गोड राहिलेला नाहीस.” रितिकानं ही पोस्ट गंभीरपणे नाही तर मजेत लिहिली आहे. कारण, या पोस्टमध्ये तिने सर्वात गोड कोण आहे ते देखील सांगितलं आहे. रितिकाच्या मते रोहित नाही तर एक कुत्रा सध्या सर्वात गोड आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा तडाखा, दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय WTC Final मध्ये रोहित फ्लॉप न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) रोहित शर्माला दोन्ही इनिंगमध्ये चांगली सुरुवात मिळाली होती. त्यानंतर त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो पहिल्या इनिंगमध्ये 34 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 30 रन काढून आऊट झाला. टीम इंडियानं फायनल मॅच 8 विकेट्सनं गमावली.
  Published by:News18 Desk
  First published: