मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: टेस्ट सीरिजपूर्वी महेंद्रसिंह धोनीला भेटला ऋषभ पंत, पाहा PHOTO

IND vs ENG: टेस्ट सीरिजपूर्वी महेंद्रसिंह धोनीला भेटला ऋषभ पंत, पाहा PHOTO

ऋषभ पंत (Rishabh Pant) आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यापासून त्याची तुलना महेंद्र सिंह धोनीशी (MS Dhoni) झाली आहे. इंग्लंड सीरिजपूर्वी पंतनं धोनीची भेट घेतली.

ऋषभ पंत (Rishabh Pant) आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यापासून त्याची तुलना महेंद्र सिंह धोनीशी (MS Dhoni) झाली आहे. इंग्लंड सीरिजपूर्वी पंतनं धोनीची भेट घेतली.

ऋषभ पंत (Rishabh Pant) आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यापासून त्याची तुलना महेंद्र सिंह धोनीशी (MS Dhoni) झाली आहे. इंग्लंड सीरिजपूर्वी पंतनं धोनीची भेट घेतली.

मुंबई, 27 जानेवारी :  ऋषभ पंत (Rishabh Pant) आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यापासून त्याची तुलना महेंद्र सिंह धोनीशी (MS Dhoni) झाली आहे. पंतनं ब्रिस्बेन टेस्टमध्ये (Brisbane Test) नाबाद 89 रनची खेळी केली होती. या जबरदस्त खेळीनंतर पुन्हा एकदा ऋषभ पंत हा धोनीचा उत्तराधिकारी असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) टेस्ट सीरिजमध्येही पंतकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतलेल्या ऋषभ पंतनं नुकतीच महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली. धोनीची पत्नी साक्षी धोनीनं (Sakshi Dhoni) नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत धोनी आणि साक्षी सोबत पंत देखील आहे. या फोटोत धोनीनं हिरव्या रंगाची टोपी घातली आहे. धोनी साक्षीसोबत सेल्फी घेत असून त्यांच्या मागे ऋषभ पंत उभा आहे.

(हे वाचा-IND vs ENG: इंग्लंड सीरिजसाठी तीन खेळाडू चेन्नईत दाखल, वाचा संपूर्ण वेळापत्रक)

ऋषभ पंतनं लाल रंगाचा टी शर्ट घातला असून त्याममध्ये टॉम या कार्टून कॅरेक्टरचा फोटो आहे. हा फोटो शेअर करुन साक्षीनं मिसिंग यू गाईज.., असं कॅप्शन दिलं आहे. धोनी सोशल मीडियावर (Social Media) अगदी कमी सक्रीय असला तरी साक्षी ही नेहमी सक्रीय असते. ती नेहमी धोनीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करते. या दरम्यानच तिने पंतबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतात परतल्यावर ऋषभ पंतनं धोनीबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल त्याचं मत व्यक्त केलं होतं. 'तुमची तुलना धोनीसारख्या खेळाडूसोबत झाली तर नक्कीच छान वाटतं. तुम्ही माझी तुलना धोनीशी करता. हे खूप छान आहे, पण माझी तुलना कुणाशी करावी असं मला वाटत नाही. मला भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. कोणत्याही तरुण खेळाडूची दिग्गज खेळाडूबरोबर तुलना योग्य नाही', असं मत पंतनं व्यक्त केलं होतं.

First published:

Tags: MS Dhoni, Sakshi dhoni