मुंबई, 22 जुलै: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात 4 ऑगस्टपासून पहिली टेस्ट सुरू होणार आहे. टीम इंडियाचा विकेट किपर - बॅट्समन ऋषभ पंतला (Rishabh Pant) काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पंत या टेस्टमध्ये खेळणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला होता. आता तो संभ्रम दूर झाला आहे. बीसीसीआयनं (BCCI) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची घोषणा केली आहे.
'हॅलो ऋषभ पंत, तुला परत पाहून छान वाटले,' असे ट्विट बीसीसीआयनं केले आहे. पंत आता कोरोनातून पूर्ण बरा झाला असून तो टीम इंडियाच्या कँपमध्ये दाखल झालाय. आता दुसरी प्रॅक्टीस मॅच आणि पहिल्या टेस्टसाठी उपलब्ध आहे. कोरोनाची लागण झाल्यानं पंत पहिली प्रॅक्टीस मॅच खेळू शकला नव्हता. त्याचा क्वारंटाईन कालावधी संपला असून तो आता टीम इंडियामध्ये दाखल झाला आहे.
Hello @RishabhPant17, great to have you back 😀#TeamIndia pic.twitter.com/aHYcRfhsLy
— BCCI (@BCCI) July 21, 2021
23 जूनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर (WTC Final) भारतीय खेळाडूंना 20 दिवसांचा ब्रेक देण्यात आला होता. याच काळात ऋषभ पंत आणि टीमचे थ्रो डाऊन तज्ज्ञ दयानंद जारानी (Dayanand Jarani) यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Ishwaran), ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) हेदेखील दयानंद जारानी यांच्या संपर्कात आले होते, त्यामुळे त्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. इश्वरन, साहा आणि भरत अरुण यांना क्वारंटाईन काळ 24 जुलैला संपणार आहे. तिघांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, पण काही काळ ते आयसोलेशनमध्ये राहणार आहेत.
पहिल्या टेस्टपूर्वी विराटचं टेन्शन गेलं, अनुभवी बॉलरला गवसला फॉर्म
4 ऑगस्टपासून सुरू होणारी 5 टेस्ट मॅचची सीरिज भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पुढच्या सत्राची पहिलीच सीरिज असेल. त्यामुळे टीम इंडिया तयारीमध्ये कोणतीही कमी ठेवणार नाही. टीम इंडिया टेस्ट सीरिज संपल्यानंतर युएईला जाईल, तिकडे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे (IPL) उरलेले 31 सामने होणार आहेत. यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup) आयोजनही युएईमध्येच करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Rishabh pant