'कॅच सुटल्यानंतर पंत चेंडू पकडण्यास देखील घाबरतो'

'कॅच सुटल्यानंतर पंत चेंडू पकडण्यास देखील घाबरतो'

पंतसाठी ही बाब जितकी जमेची होती तितकीच ती धोक्याची ठरली.

  • Share this:

मुंबई, 05 डिसेंबर: ऋषभ पंत (Rishabh Pant)जेव्हा भारतीय संघाकडून खेळण्यास आला तेव्हा त्याला महेंद्र सिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हटले जात होते. पंतसाठी ही बाब जितकी जमेची होती तितकीच ती धोक्याची ठरली. कारण पंतकडून काहीही चुका झाल्या की त्याची तुलना धोनीशी केली जाते. त्यातूनच पंतवर दबाव वाढत गेला आणि चुका देखील. आता पंतबाबत एका माजी क्रिकेटपटूने असे विधान केले आहे की, त्याच्याकडून एखादा कॅच जरी सुटला तरी तो चेंडू पकडण्यास घाबरतो.

मुंबईत 11व्या दिलीप सरदेसाई मेमोरियल लेक्चरमध्ये बोलताना माजी क्रिकेटटपू फारूख इंजिनिअर (Farokh Engineer)यांनी पंतबाबत त्यांची मते मांडली. खराब कामगिरीमुळे पंतचा आत्मविश्वास कमी झाला आहे. फलंदाजांसाठी प्रशिक्षक आहे, तसेच क्षेत्ररक्षणासाठी देखील कोच आहे. पंत त्यांना जाऊन काय सांगणार. प्रत्येक जण त्याच्यावर टीका करत आहे. त्यामुळेच त्याच्यावर दबाव वाढला आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की, एखादा कॅच जरी सुटला तरी पंत चेंडू पकडण्यास घाबरतो.

पंत एक चांगला विकेटकिपर आहे. पण त्याच्याकडून काही तांत्रिक चूका होत आहेत. त्यात लवकरच सुधारणा होती. सध्या संघात अशा विकेटकिपरना स्थान दिले जाते जे आधी फलंदाज आहेत, असे इंजिनिअर म्हणाले. कॅच सुटल्यामुळे, खराब फलंदाजीमुळे आणि डीआरएस संदर्भात चुकीचा निर्णय घेतल्याने माजी क्रिकेटपटूंनी पंतवर टीका केली आहे. सोशल मीडियावर देखील पंतला चाहत्यांनी अनेक वेळा ट्रोल केले आहे. सध्या पंत वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेच्या तयारीत आहे. हैदराबाद येथे दोन्ही संघादरम्यान पहिला टी-20 सामना 6 डिसेंबर रोजी होणार आहे. पंतसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. जर या मालिकेत देखील त्याने खराब कामगिरी केली तर पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात त्याला स्थान मिळणार नाही हे जवळपास निश्चित मानले जाते.

पंतने वेस्ट इंडिजविरुद्ध 7 सामन्यात 28.50च्या सरासरीने 171 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर टी-20मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक जमा आहे. अशा परिस्थितीत आत्मविश्वासाने त्याने खेळ केला तर ही मालिका त्याला चांगली जाऊ शकते.

First published: December 5, 2019, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading