World Cup : या पाच गोष्टींमुळे पंतला मिळाली धवनच्या जागी संधी!

ICC Cricket World Cup मध्ये भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्याच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 06:23 PM IST

World Cup : या पाच गोष्टींमुळे पंतला मिळाली धवनच्या जागी संधी!

ICC Cricket World Cup स्पर्धेतून भारताचा सलामीवीर शिखर धवन बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे उर्वरित सामन्यात तो खेळू शकणार नाही. त्याच्या जागी रिषभ पंतला संघात जागा मिळाली आहे. बीसीसीआयने धवन खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधीच रिषभ पंत इंग्लंडला पोहचला आहे.

भारताचा वर्ल्ड कप संघ जाहीर झाला तेव्हा रिषभ पंतचे नाव नसल्याने अनेकांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले हेते. त्यानंतर धवनला दुखापत झाल्यानंतर पर्याय म्हणून पंतचे नाव समोर आले. यासाठी पाच गोष्टी पंतच्या पथ्यावर पडल्या.

रिषभ पंतच्या खेळात आक्रमकपणा आहे. धवन आणि त्याच्या खेळातलं हे साम्य आणि पंत सलामीलासुद्धा खेळू शकतो.

Loading...

शिखर धवन डावखुरा असून रिषभ पंतसुद्धा डावखुरा आहे. त्यामुळे धवनच्या जागी तोच योग्य पर्याय ठरला.

रिषभ पंतची इंग्लंडमधील कामगिरी चांगली राहिली आहे. पंत इंग्लंडमध्ये कसोटीत शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

यंदाच्या आयपीएलमध्येसुद्धा पंतने फलंदाजीत चमक दाखवली. त्याने 16 सामन्यात 488 धावा केल्या. यात त्याची सरासरी 37.53 इतकी तर स्ट्राईक रेट 162.66 एवढा होता. दिल्लीकडून खेळताना त्याने एकहाती सामने जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

रिषभ पंतने  2018-19 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या कसोटी मालिका विजयात महत्त्वाची कामगिरी केली होती. त्याने 4 सामन्यातील 7 डावात 350 धावा केल्या होत्या. मालिकेत त्याच्यापेक्षा फक्त चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 521 धावा केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...