दिनेश कार्तिक अन् पांड्यापेक्षाही ऋषभ पंत ठरला वरचढ

दिनेश कार्तिक अन् पांड्यापेक्षाही ऋषभ पंत ठरला वरचढ

बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक करारात ऋषभ पंतचा ए श्रेणीमध्ये समावेश

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मार्च : बीसीसीआयने खेळाडूंसोबतचे वार्षिक करार जाहीर केले आहेत. यामध्ये सध्या फॉर्मात असलेल्या ऋषभ पंतचा समावेश ए श्रेणीत करण्यात आला आहे. यानुसार त्याला 2018-19 या एका वर्षासाठी 5 कोटी रुपये मिळणार आहेत. यावेळी 3 खेळाडूंना ए श्रेणीत जागा देण्यात आली आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश ए श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. या तिघांनाही वर्षाला 7 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

यंदा ए श्रेणीत 11 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर बी श्रेणीत 4 खेळाडूंना जागा देण्यात आली आहे. या श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला 3 कोटी रुपये दिले जातात. याशिवाय सी ग्रेडमध्ये सात खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून त्यांना वर्षाला एक कोटी रुपये दिले जातात.

ए श्रेणीतील खेळाडू : आर अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, महेंद्र सिंग धोनी, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत

बी श्रेणीमध्ये असलेले खेळाडू : के एल राहुल, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दीक पांड्या

सी श्रेणी असलेले खेळाडू : केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायडु, मनिष पांडे, हनुमा विहारी आणि वृद्धिमान साहा

21 वर्षीय ऋषभ पंतने इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त कामगिरी केली. त्याने वृद्धिमान साहाच्या जागी संघात स्थान मिळवलं होतं. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत शतक केले होते. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये 159 धावा केल्या होत्या.

First published: March 8, 2019, 9:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading