‘ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर घरचे मागं लागले आहेत,’ ऋषभ पंतने मागितली मदत

‘ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर घरचे मागं लागले आहेत,’ ऋषभ पंतने मागितली मदत

ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) घरचे त्याच्या मागं लागले आहेत. स्वत: पंतनच ट्विट (Tweet) करुन ही माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जानेवारी :  टीम इंडियाचा (Team India) विकेटकिपर ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) ऑस्ट्रेलिया दौरा चांगलाच फायदेशीर ठरला आहे. पंतनं सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी 97 रन्सची आक्रमक खेळी केली होती. टीम इंडियाचा पराभव टाळण्यात त्या खेळीचं मोठं योगदान होतं. त्यानंतर ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये त्यानं नाबाद 89 रन काढले. ब्रिस्बेन टेस्टमधील विजयी चौकार देखील पंतनेच मारला.  त्याच्या या चौकारासोबतच भारतानं ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा 2-1 या फरकानं टेस्ट सीरिज जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्याचबरोबर ब्रिस्बेनमध्ये तब्बल 32 वर्षांनी ऑस्ट्रेलियन टीमला टेस्ट मॅचमध्ये पराभूत केलं.

‘घरचे मागं लागले आहेत’

ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर ऋषभ पंतच्या घरचे त्याच्या मागं लागले आहेत. स्वत: पंतनच ट्विट करुन ही माहिती दिली आहे. “जेंव्हापासून ऑस्ट्रेलियाहून परतलो आहे, घरचे नवं घर घेण्यासाठी मागं लागले आहे. गुडगाव योग्य असेल का? कोणता दुसरा पर्याय असेल तर सांगा,’’ असं ट्विट पंतनं केलं आहे.

चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

ऋषभ पंतच्या ट्विटर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. फॅन्सनं त्याला दिल्ली, जोधपूर, हैदराबादसह अहमदाबाद आणि अगदी ब्रिस्बेनमध्येही घर घेण्याचा सल्ला दिला आहे.

धोनीची घेतली होती भेट

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतलेल्या ऋषभ पंतनं नुकतीच महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली. धोनीची पत्नी साक्षी धोनीनं (Sakshi Dhoni) नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत धोनी आणि साक्षी सोबत पंत देखील आहे. या फोटोत धोनीनं हिरव्या रंगाची टोपी घातली आहे. धोनी साक्षीसोबत सेल्फी घेत असून त्यांच्या मागे ऋषभ पंत उभा आहे.

Published by: News18 Desk
First published: January 28, 2021, 2:28 PM IST

ताज्या बातम्या