...तर पंत, रायडू आणि सैनीला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी

...तर पंत, रायडू आणि सैनीला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी

निवड समितीने सोमवारी जाहीर केलेल्या 15 जणांच्या संघातून ऋषभ पंत आणि रायडूला वगळण्यात आलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल : 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारताने संघाची घोषणा केली. यातील तीन स्टँडबाय खेळाडूंची नावे निवड समितीने बुधवारी जाहीर केली. यात अंबाती रायडू, ऋषभ पंत आणि नवदीप सैनी यांच्या नावांचा समावेश आहे. जर वर्ल्ड कपच्या दरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर या तिघांपैकी कोणालाही इंग्लंडला पाठवले जाऊ शकते.

भारतीय संघाच्या निवडीआधी रायडू आणि पंतचा संघांमध्ये समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, या दोघांनाही अंतिम 15 मध्ये स्थान मिळाले नाही.

वाचा - World Cup : भारतीय संघातले 'हे' हिरो शाळेत मात्र झिरो

दिल्लीकडून खेळणाऱ्या नवदीप सैनीला स्टँडबाय खेळाडू म्हणून निवडल्याने सर्वांच्य भुवया उंचावल्या आहेत. दिल्लीसाठी त्याने चांगला खेळ केला असला तरी आयपीएलमध्ये मात्र तो धडपडत आहे. वेगवान गोलंदाजी करणारा नवदीप सैनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळतो.

World Cup : इंग्लंडच्या संघात KKR चा खेळाडू इन तर राजस्थानचा आऊट

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक

VIDEO : प्रियांका गांधीबद्दल उमा भारतींचं वादग्रस्त वक्तव्य

First published: April 17, 2019, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading