ढाका, 23 मे: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) यांच्यातील 3 मॅचची वन-डे मालिका रद्द होण्याची शक्यता आहे. बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका टीममधील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. श्रीलंका टीमचा बॉलिंग कोच चामिंडा वास (Chaminda Vaas) यांच्यासह इसरु उडाना (Isuru Udana) आणि शिरन फर्नांडो (Shiran Fernando) यांना कोरोनाची लागण झाली आहे. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतील पहिली वन-डे आज (रविवार 23 मे) रोजी होणार आहे. तर दुसरी आणि तिसरी वन-डे 25 आणि 28 मे रोजी नियोजित आहेत. या तीन्ही वन-डे ढाकामधील शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंका टीम मॅनेजमेंट या खेळाडूंच्या दुसऱ्या आरटीआर-पीसीआर (RTR - PCR) रिपोर्टची वाट पाहत आहे. एक दिवसापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक खालिद महमूद (Khaled Mahmud) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते या मालिकेच्या दरम्यान उपस्थित राहणार नाहीत. त्यांना सध्या घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
भारत दौऱ्यावरही संकट
कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) आधीच क्रिकेट स्पर्धा कमी झाल्या असताना आता भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिजवर नवं संकट ओढावलं आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket) खेळाडूंसोबत केलेला करार सार्वजनिक केल्यामुळे खेळाडू बोर्डावर नाराज झाले आहेत.
IPL 2021 साठी BCCI चा 30 दिवसांचा प्लॅन, नवी तारीखही आली समोर
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नव्या कराराबाबत माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. नव्या करारानुसार खेळाडूंचं मूळ वेतन कमी करण्यात आलं, याचं कारण खेळाडूंचं प्रदर्शन असल्याचं सांगण्यात आलं. या निर्णयाच्या विरोधात श्रीलंकेच्या वरिष्ठ खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.