World Cupमधील पराभवानंतरची धक्कादायक बातमी; भारतीय संघात पडलेत दोन गट!

World Cupमधील पराभवानंतरची धक्कादायक बातमी; भारतीय संघात पडलेत दोन गट!

सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघात दोन गट पडल्याचे वृत्त समोर येत आहे.

  • Share this:

लंडन, 13 जुलै: सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघात दोन गट पडल्याचे वृत्त समोर येत आहे. सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर संघातील एक गट आहे जो एकमेकांवर पराभवाचे खापर फोडत आहेत तर काही जण पराभवासाठी कोट रवी शास्त्री यांना जबाबदार धरत आहेत. काही जण कर्णधार विराट कोहलीवर नाराज आहेत.

साखळी फेरीत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले होते. पण सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताचा 18 धावांनी पराभव झाला होता. केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगतात हा पराभव धक्कादायक असा होता. भारतीय संघाच्या पराभवानंतर सेमीफायनलमध्ये झालेल्या चुकांवर अनेकांनी टीका देखील केली. आता विविध प्रसारमाध्यमांमध्ये झालेल्या वृत्तानुसार संघातील सर्व निर्णय विराट आणि कोच शास्त्रीच घेतात. हे दोघे संघातील अन्य कोणत्याही सदस्यासोबत चर्चा करत नाहीत. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार यामुळेच कोच आणि कर्णधार यांना कोणीही विरोध करत नाही. काही खेळाडूंच्या मते भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला याला शास्त्री आणि विराट यांचा एका बाजूने विचार करण्याचा स्वभाव जबाबदार आहे. हे दोघे प्रत्येक निर्णय संघावर लादतात असे काहींचे म्हणणे आहे.

विराट विरुद्ध रोहित

रिपोर्ट नुसार भारतीय संघात दोन गट पडले आहेत. एक गट उपकर्णधार रोहित शर्मा सोबत आहे. तर दुसरा गट कर्णधार विराट सोबत आहे. जे खेळाडू विराटला आवडतात त्यांचे संघातील स्थान निश्चित असते. पण रोहित सोबत असणाऱ्या संघात स्थान असेलच असे नाही. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना कामगिरीच्या आधारावर संघाबाहेर ठेवले जाऊ शकते. पण विराटच्या सोबत असणाऱ्या खेळाडूंना हा नियम लागू होत नाही. के.एल.राहुलची कामगिरी कशी ही असली तरी त्याला संघात स्थान दिले जाते.

शास्त्रींच्या जाण्याची वाट

भारतीय संघातील खेळाडू शास्त्री आणि कर्णधारापासून कंटाळलेत असेही वृत्त आहे. काही खेळाडू नवा कोच आणि कर्णधाराची वाट पाहत आहेत. एक खेळाडू म्हणून कोहली सर्वांच आवडतो पण कर्णधाराच्या भूमिकेत अनेकांना विराट आवडत नाही.

रायडू आवडत नव्हता म्हणून...

अंबाती रायडूला संघाबाहेर ठेवण्यासंदर्भात असे सांगितले जाते की, त्याला संघाबाहेर ठेवण्याचे कारण शोधले जात होते. संघाबाहेर ठेवण्यासाठी रायडू कधी खराब कामगिरी करतो याची वाट पाहिली जात होती, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

VIDEO: पश्चिम रेल्वेवर उद्या 5 तासांचा मेगाब्लॉक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 13, 2019, 12:26 PM IST

ताज्या बातम्या