Home /News /sport /

रिकी पॉन्टिंगनं केला दुसऱ्या टीमशी 3 वर्षांचा करार, आता दिल्ली कॅपिटल्सचं काय होणार?

रिकी पॉन्टिंगनं केला दुसऱ्या टीमशी 3 वर्षांचा करार, आता दिल्ली कॅपिटल्सचं काय होणार?

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting) बिग बॅशमधील होबार्ट हरिकेन्सशी (Hobart-Hurricanes) करार केला आहे.

    मुंबई, 9 जून :  ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting) बिग बॅशमधील होबार्ट हरिकेन्सशी (Hobart-Hurricanes) करार केला आहे.  पॉन्टिंगनं 3 वर्षांसाठी हा करार केला आहे. पॉन्टिंग या टीमचा हेड ऑफ स्ट्रेटजी असेल. पॉन्टिंग आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा हेड कोच आहे. त्यामुळे या करारानंतर पॉन्टिंग दिल्लीसोबत राहणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पॉन्टिंगनं हा करार फुल टाईम नाही तर पार्ट टाईम केलाय. या काळात तो चॅनल सेव्हनवर 'ऑस्ट्रेलियन समर'मध्ये कॉमेंट्री करणार आहे. त्याचबरोबर तो दिल्ली कॅपिटल्सचा कोच म्हणून देखील काम करणार आहे. पॉन्टिंगला होबार्ट टीममध्येही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. यामध्ये नव्या कोचची नियुक्ती करणे हे पॉन्टिंगसमोरील पहिलं महत्त्वाचं काम आहे. होबार्टला अद्याप एकदाही बिग बॅश लीग स्पर्धेचं विजेतपद पटकावता आलेलं नाही. मागील सिझनमधील अपयशानंतर टीमचे हेच कोच अ‍ॅडम ग्रिफिथ यांनी राजीनामा दिला आहे. लँगर होणार कोच? ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी हेड कोच जस्टीन लँगरचं होबार्टच्या प्रशिक्षकपदासाठी नाव आघाडीवर आहे. लँगर हा पॉन्टिंगच्या अतिशय जवळचा आहे. त्यानं अद्याप त्याच्या कोचिंग भविष्याचा निर्णय घेतलेला नाही. ऑस्ट्रेलियन टीमच्या कोच पदावरून लँगरला तडकाफडकी हटवण्यात आले होते. त्यामुळे तो नवी जबाबदारी घेण्यापूर्वी विचार सर्व बाजूंनी विचार करेल. बाबर आझमनं मॅचबरोबरच मनही जिंकलं, VIDEO आहे पुरावा रिकी पॉन्टिंगनं यापूर्वी बिग बॅश लीगमध्ये होबार्टकडून आठ सामने खेळले आहेत. पॉन्टिंग निवृत्त होण्यापूर्वीच्या दोन सिझनमध्ये या टीमचा सदस्य होता. आजवर ज्या टीमला नेहमी पाठिंबा दिला आहे, त्याच टीमची जबाबदारी मिळणं हा आनंदाचा क्षण असल्याचं पॉन्टिंगनं स्पष्ट केलं आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Australia, Cricket news, Delhi capitals

    पुढील बातम्या