'स्मिथला अजून टार्गेट केलं तर आश्चर्य नाही', पाँटिंगला झाली 2005 ची आठवण

अॅशेस मालिका म्हणजे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासाठी एक युद्धच आहे. आर्चरच्या गोलंदाजीवर स्मिथ जखमी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिगला 2005 च्या एका घटनेची आठवण झाली.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 02:38 PM IST

'स्मिथला अजून टार्गेट केलं तर आश्चर्य नाही', पाँटिंगला झाली 2005 ची आठवण

लॉर्ड्स, 18 ऑगस्ट : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत स्टीव्ह स्मिथला जोफ्रा आर्चरचा चेंडू लागल्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही देशांमधील क्रिकेट युद्धाची चर्चा रंगली आहे. अॅशेस मालिकेला हे दोन्ही देश खेळापेक्षा युद्ध म्हणूनच पाहतात. स्मिथवर झालेला उसळत्या चेंडूचा मारा आणि त्यात तो जखमी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगला 2005 च्या अॅशेस मालिकेची आठवण झाली.

दुसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी इंग्लंडनं 96 धावांत चार गडी गमावले. ऑस्ट्रेलियानं जर शेवटच्या दिवशी त्यांना चहापानापर्यंत गुंडाळलं तर सामन्याचा निकाल लागू शकतो. दरम्यान, चौथ्या दिवशी आर्चरने टाकलेल्या वेगवान चेंडुच्या दणक्यानं स्मिथ मैदानावरच कोसळला होता. त्यानंतर रिकी पाँटिंगला 2005 च्या अॅशेस मालिकेची आठवण झाली. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसननं ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना दुखापतग्रस्त केलं होतं. पाँटिंग म्हणाला ती सकाळ खूपच भीतीदायक अशी होती. काल काही आठवणी जाग्या झाल्या. मला आठवतं जेव्हा मला चेंडू लागला तेव्हा मायकल वॉनने त्याच्या खेळाडूंना सांगितलं होतं की कोणीही पाँटिगला बघायला जाणार नाही. माझ्यासाठी ते योग्यच होतं कारण मीसुद्धा त्यांना माझ्यापासून दूर रहायला सांगितलं असतं.

शनिवारी स्टिव्ह स्मिथला चेडू लागल्यानंतर तो काही काळ मैदानाबाहेर गेला. त्यानंतर पुन्हा स्मिथ मैदानात उतरला. त्यानं एकूण 92 धावंची खेळी केली. पाँटिंग म्हणाला की, स्मिथनं पुन्हा येऊन फलंदाजी केली. तो 70 धावांपर्यंत मजल मारेल असा विश्वास होता. आता इंग्लंडच्या गोलंदाजांनी आणखी मारा केला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.

जोफ्रा आर्चरनं स्मिथला टार्गेट केलं पण तो बाद करू शकला नाही. स्मिथने धैर्यानं सामना केला. त्याच्या मानेला लागलं असलं तरी तो पुन्हा चांगली फलंदाजी करेल. त्याला कसलीच भीती नाही दररोज हा खेळ करावा लागतो. दुखापत होत असते पण कोणतीच गोष्ट तुमची मानसिकता नाही बदलत असंही पाँटिंग म्हणाला.

VIDEO: पाणीपुरीत सापडल्या जिंवत अळ्या, पोलखोल होताच विक्रेता फरार!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 18, 2019 02:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...