लॉर्ड्सवर कसोटीत दोन्ही संघ उतरणार लाल जर्सीत, जाणून घ्या कारण

अॅशेस मालिकेतील दुअॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लॉर्ड्स लाल रंगात रंगणार आहे. सऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लॉर्ड्स लाल रंगात रंगणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 03:00 PM IST

लॉर्ड्सवर कसोटीत दोन्ही संघ उतरणार लाल जर्सीत, जाणून घ्या कारण

अॅशेस मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला. या विजयासह त्यांनी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं पुनरागमानंतर दोन्ही डावात शतकं केली. तसेच नाथन लायनच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव ढासळला.

दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लॉर्ड़ स्टेडियम लाल रंगात रंगणार आहे. फक्त स्टेडियमच नाही तर दोन्ही संघातील खेळाडूसुद्धा लाल जर्सीत दिसणार आहेत. फुफ्फुसाच्या कर्करोगाची जनजागृती करण्यासाठी लाल रंगाचे कपडे घालणार आहेत.

इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसची पत्नी रूथ स्ट्रॉसला फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. गेल्या वर्षी तिचं या आजारानं निधन झालं. त्यानंतर रुथच्या नावानं फाऊंडेशन सुरू केलं.

रूथ फाऊंडेशनला निधी मिळण्यासाठी लॉर्ड्सवर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लाल रंगाचे कपडे घातलेले प्रेक्षक दिसणार आहेत. इंग्लंड क्रिकेट मंडळ आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लब यांच्यामार्फत संयुक्तरित्या हा उपक्रम राबवला जाणार आहे.

 लॉर्ड्सवर फक्त रुथला आदरांजली वाहण्यासाठी लागल रंग वापरण्यात येणार नाही तर मिळणाऱ्या निधीतून दुर्मिळ आजाराबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. हा निधी आजारावरील उपचार शोधणाऱ्या संशोधनासाठी खर्च करण्यात येईल असं अँड्र्यू स्ट्रॉसनं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 10, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...