एका टी20 सामन्यात 7 विश्वविक्रम, रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये पदार्पण करणारा सर्वात वयस्क खेळाडूचे वय वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 03:41 PM IST

एका टी20 सामन्यात 7 विश्वविक्रम, रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : क्रिकेटच्या मैदानावर दररोज नवनवे विक्रम होत असतात. आता एकाच सामन्यात एक दोन नव्हे तर तब्बल सात विश्वविक्रम झाले आहेत. 30 ऑगस्टला झालेल्या या सामन्यात टी 20 मधील अनेक विक्रम मोडले. रोमानिया कप स्पर्धेत झेक प्रजासत्ताक आणि तुर्की यांच्यात हा सामना झाला होता. झेक रिपब्लिकनं धावांचा डोंगर उभा केला. तर प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या तुर्कीला जेमतेम धावसंख्येवर समाधान मानावं लागलं. आयसीसीने मान्यता दिल्याने या स्पर्धेतील सर्व सामने आंतरराष्ट्रीय सामने होते.

झेक रिपब्लिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुदेश विक्रमसेकराचं शतक आणि सुमित पोखरियालच्या अर्धशतकाच्या जोरावर झेक प्रजासत्ताकनं 4 बाद 278 धावा केल्या. विक्रमसेकरानं त्याच्या खेळीत 36 चेंडूत 8 चौकार आणि 10 षटकार मारले. तुर्कीचा गोलंदाज तुनाहन तुरानच्या 4 षटकांत तब्बल 70 धावा काढल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना तुर्कीचा संघ 21 धावांपर्यंतच मजल मारू शकला. तुर्कीने 8.3 षटकांत 21 धावा केल्या. संघाचा एकच फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला. त्याच्याशिवाय फक्त दोन फलंदाज खातं उघडू शकले. इतर 8 फलंदाज शून्यावर बाद झाले. विक्रमसेकरानं शतकानंतर गोलंदाजीतही कमाल केली. त्यानं दोन धावांत दोन गडी बाद केले.

टी 20 मध्ये सर्वाधिक धावा कऱण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर होता. त्या विक्रमाशी झेक प्रजासत्ताकने बरोबरी केली आहे. अफगाणिस्तानने 3 बाद 278 धावा केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला तुर्कीने टी20मध्ये सर्वात कमी धावांवर बाद होण्याच नकोसा विक्रम नोंदवून घेतला आहे. आधीचा विक्रमही त्यांच्याच नावावर होता.

सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विश्वविक्रम झेक रिपब्लिकनं केला आहे. तुर्कीविरुद्ध त्यांनी 257 धावांनी विजय मिळवला आहे. आतंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या अंतरानं सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी रोमानियाच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी तुर्कीलाच 173 धावांनी पराभूत केलं होतं.

एका डावात सर्वाधिक खेळाडू शून्यावर बाद होण्याचा विक्रमही या सामन्यात झाला. तुर्कीचे 11 पैकी 8 फलंदाज शून्यावर बाद झाले.

सर्वात कमी चेंडूंचा डावही या सामन्यात झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी 20 सामन्यात तुर्कीचा संघ 51 चेंडू खेळू शकला. त्याखालोखाल 53 चेंडू खेळण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.

एका डावात सर्वाधिक अवांतर धावा देण्याचा विश्वविक्रम तुर्कीच्या गोलंदाजांनी केला आहे. त्यांनी झेक प्रजासत्ताकवर 39 अवांतर धावांची खैरात केली.

सुदेश विक्रमसेकरानं फक्त 35 चेंडूत शतक साजरं केलं. यासह त्यानं टी20 मध्ये सर्वात वेगवान शतक करण्याच्या रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली .

एका गोलंदाजाने टी20 सामन्यात सर्वाधिक धावा देण्याचा पराक्रमही या सामन्यात झाला. तुर्कीच्या तुनाहन तुरानने त्याच्या चार षटकांत 70 धावा दिल्या.

वाचा : वडिलांचं चहाचं दुकान, आई जनावरं चारते; एक डोळा अधू असतानाही क्रिकेमध्ये चमकला

सर्वात जास्त वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा विश्वविक्रम या सामन्यात झाला आहे. तुर्कीच्या ओस्मान गोकरनं पहिला टी20 सामना खेळला. त्याचे वय 59 वर्ष 181 दिवस इतकं आहे.

कोल्हापूर महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 8, 2019 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...