Home /News /sport /

IPL 2022 : एकाच बाजूला आले दोन्ही खेळाडू पण Run out कुणीच नाही! पाहा कॉमेडी VIDEO

IPL 2022 : एकाच बाजूला आले दोन्ही खेळाडू पण Run out कुणीच नाही! पाहा कॉमेडी VIDEO

केकेआरनं पहिल्यांदा बॅटींग करत आरसीबीसमोर विजयासाठी 129 रनचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य आरसीबीनं 4 बॉल राखून पूर्ण केले. या मॅचच्या दरम्यान एक मजेशीर प्रकार घडला

    मुंबई, 31 मार्च : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं बुधवारी अटतटीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा (RCB vs KKR) 3 विकेट्सनं पराभव केला.  केकेआरनं पहिल्यांदा बॅटींग करत आरसीबीसमोर विजयासाठी 129 रनचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य आरसीबीनं 4 बॉल राखून पूर्ण केले. या मॅचच्या दरम्यान एक मजेशीर प्रकार घडला. एक रन काढण्याच्या नादात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांचा गोंधळ उडाला आणि ते दोघंही एकाच बाजूला आहे. त्यावेळी फिल्डरनं चुकीचा थ्रो केल्यानं आरसीबीला काही फटका बसला नाही. आरसीबीच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरनं ती ओव्हर टाकली. त्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर कार्तिक ऑफ साईडला फटका मारला आणि एक रन काढण्यासाठी हर्षल पटेलला कॉ़ल दिला. त्याचवेळी बॉलजवळ फिल्डर असल्याची जाणीव कार्तिकला झाली. त्याने रन काढण्यास नकार दिला. पण, तो पर्यंत हर्षल पटेलनं अर्ध क्रिझ पार केले होते. त्यावेळी दोन्ही बॅटर एकाच दिशेला पळाले. ऑफ साईडला फिल्डिंग करत असलेल्या उमेश यादवनं स्टम्पवर थेट थ्रो करण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला. त्यामुळे कार्तिकला एक रन पूर्ण करण्याची संधी मिळाली. उमेशनं हा थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला केला असता तर कदाचित मॅचचा निकाल बदलला असता. कोलकातानं दिलेलं 129 रनचं माफक आव्हान पार करतानाही आरसीबीचं धाबं दणाणलं होतं, पण अखेरच्या ओव्हरमध्ये कार्तिकने एक सिक्स आणि एक फोर मारून टीमला जिंकवून दिलं. 7 बॉलमध्ये 14 रनवर कार्तिक नाबाद राहिला. आरसीबीनं हा सामना 4 बॉल आणि 3 विकेट्सनं जिंकला. ICU मधील वडिलांच्या सेवेत असलेल्या मुलाला होता Dinesh Karthik च्या इनिंगचा आधार, वाचा इमोशनल स्टोरी पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत या स्पर्धेची दमदार सुरूवात करणाऱ्या केकेआरचा दुसऱ्याच मॅचमध्ये पराभव झाला आहे. दुसरिकडं आरसीबीनं पंजाब किंग्ज विरूद्ध झालेल्या पराभवानंतर कमबॅक करत पॉईंट टेबलमध्ये खातं उघडलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, RCB, Video viral

    पुढील बातम्या