दिवाळीच्या फटाक्यांवरून विराट ट्रोल झाल्यानंतर RCB कडून स्पष्टीकरण

दिवाळीच्या फटाक्यांवरून विराट ट्रोल झाल्यानंतर RCB कडून स्पष्टीकरण

दिवाळीमध्ये फटाके न वाजवण्याचं आवाहन करणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं होतं. हा वाद वाढल्यानंतर अखेर बँगलोर (RCB) च्या टीमने आणखी एक ट्विट करत स्पष्टीकरण दिलं.

  • Share this:

मुंबई, 17 नोव्हेंबर : दिवाळीमध्ये फटाके न वाजवण्याचं आवाहन करणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं होतं. विराटने चाहत्यांना फटाके न वाजवता पर्यावरण वाचवा आणि प्रदुषण कमी करा, असं आवाहन केलं. पण टीकाकारांनी विराटच्या वाढदिवसाला फटाके वाजवण्यात आल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आणि विराटवर टीका केली. बँगलोर (RCB)च्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन 5 नोव्हेंबरला विराटच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाकला. या व्हिडिओमध्ये फटाके उडताना दिसत होते.

हा वाद वाढल्यानंतर अखेर बँगलोर (RCB) च्या टीमने आणखी एक ट्विट करत स्पष्टीकरण दिलं. विराटच्या वाढदिवसाच्या व्हिडिओमध्ये फटाके वाजताना दिसत आहेत, पण तो फटाक्यांचा व्हिडिओ जुना आहे. युएईच्या फ्लॅग डे सेलिब्रेशनवेळी उडवण्यात आलेल्या फटाक्यांच्या व्हिडिओची क्लिप आम्ही विराटच्या वाढदिवसाच्या व्हिडिओमध्ये वापरली, असं बँगलोरच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.

'तुम्ही सगळे कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदी आणि शांततामय दिवाळी साजरी करत असाल, अशी अपेक्षा. काही दिवसांपूर्वी फटाके वाजवल्याचा आम्ही ट्विटरवर शेयर केलेला व्हिडिओ जुना युएईच्या फ्लेग डे सेलिब्रेशनचा होता. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम इतकी वर्ष नेहमीच पर्यावरण वाचवण्यासाठी कठोर मेहनत करत आहे,' असं ट्विट आरसीबीने केलं आहे.

यंदाच्या आयपीएल (IPL 2020) बँगलोरची टीम पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिली. एलिमिनेटरमध्ये हैदराबादने बँगलोरचा 6 विकेटने पराभव केला. आयपीएल संपल्यानंतर विराट कोहली भारतीय टीमसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. 27 नोव्हेंबरला वनडे सीरिजपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅच खेळणार आहे.

Published by: Shreyas
First published: November 17, 2020, 10:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading