Home /News /sport /

महेंद्रसिंह धोनीच्या 'त्या' सल्ल्यानंतर खेळ बदलला! रविंद्र जडेजाचा खुलासा

महेंद्रसिंह धोनीच्या 'त्या' सल्ल्यानंतर खेळ बदलला! रविंद्र जडेजाचा खुलासा

रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा सध्या टीम इंडियाचा नंबर 1 ऑल राऊंडर आहे. क्रिकेटमधील तीन्ही प्रकारात त्याने उपयुक्तता सिद्ध केली आहे. आपल्या खेळात धोनीच्या सल्ल्यानंतर बदल झाला, असा खुलासा जडेजानं केला आहे.

    मुंबई, 2 ऑगस्ट : रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा सध्या टीम इंडियाचा नंबर 1 ऑल राऊंडर आहे. क्रिकेटमधील तीन्ही प्रकारात त्याने उपयुक्तता सिद्ध केली आहे. जडेजाच्या बॅटींगमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठा बदल झाला आहे. तो एक विश्वासू लोअर ऑर्डर बॅट्समन बनला आहे. जडेजानं बॅटींगमधील बदलाचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) दिलं आहे. धोनीनं 2015 साली दिलेल्या सल्ल्यानंतर आपली बॅटींग बदलली, असा खुलासा जडेजानं केला आहे. काय दिला होता सल्ला? जडेजानं एका मुलाखतीच्या दरम्यान हा खुलासा केला आहे. 'ज्या बॉलवर शॉट मारणे शक्य नाही, त्यावर देखील मी मारण्याचा प्रयत्न करत आहे, असं धोनीनं मला 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यान सांगितलं होतं. करिअरच्या सुरुवातीला माझ्या बॅटींगमधील जजमेंट योग्य नव्हते.  एखाद्या बॉलवर शॉट मारावा की नाही, यावर मी अनेकदा गोंधळात पडत असे. धोनीच्या त्या सल्ल्यानंतर माझं आयुष्य बदललं,' असं जडेजानं सांगितलं. आयपीएलमध्ये खेळणार एकत्र जडेजा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) त्याला फार काही कमाल करता आली नव्हती. त्यानंतर आता इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टमध्ये चांगली कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. अर्थात इंग्लंडमधील फास्ट बॉलिंगला मदत करणारे पिच पाहता जडेजाला सर्व पाच टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! इंग्लंडचा 'तो' प्लॅन उघड इंग्लंड दौऱ्यानंतर लगेच यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत जडेजा आणि धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमकडून एकत्र खेळणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी जडेजा जोरदार फॉर्मात होता. तोच फॉर्म यूएईमध्ये कायम ठेवून सीएसकेला विजेतेपद मिळवून देण्याचा जडेजाचा प्रयत्न असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, MS Dhoni, Ravindra jadeja

    पुढील बातम्या