Home /News /sport /

'दोन मुलींचा बाप म्हणून अस्वस्थ आहे,' शाळेत घडलेल्या घटनेमुळे अश्विन व्यथित

'दोन मुलींचा बाप म्हणून अस्वस्थ आहे,' शाळेत घडलेल्या घटनेमुळे अश्विन व्यथित

चेन्नईतील पीएसबी शाळेतील शिक्षकाला दोन मुलींचे लैंगिक शोषण (sexual harassment) केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अश्विन व्यथित झाला आहे.

    चेन्नई, 26 मे : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) सोशल मीडियाचा वापर त्याची वेगवेगळ्या विषयातील मतं मांडण्यासाठी करतो. तो गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस (coronavirus) विरुद्धच्या लढ्यात त्याचं योगदान देत असून सर्वांना कायम मास्क वापरण्याचे आवाहन करत आहे. अश्विनने आता लैंगिक शोषणाच्या (sexual harassment) विरोधात आवाज उठवला आहे. चेन्नईतील पीएसबीबी शाळेतील शिक्षकाला दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. अश्विनचं शाळेशी भावनिक नातं चेन्नईच्या पीएसबीबी शाळेशी अश्विनचे खास नाते आहे. कारण, तो याच शाळेचा विद्यार्थी आहे. आपल्या शाळेत या प्रकारची घटना घडल्याचं समजल्यानंतर अश्विनला धक्का बसला आहे. त्याने त्याची नाराजी ट्विट करुन व्यक्त केली आहे. ' चेन्नई आणि जवळपासच्या शाळेतून विशेषत: पीएसबीबीमधून आलेल्या बातम्यांनी मनाला वेदना होत आहेत. माझ्या शिक्षणाच्या दरम्यान मी कधीच तिथं अशा प्रकारची घटना ऐकली नव्हती. ही बातमी ऐकून खूप व्यथित झालो आहे. या प्रकरणात कायद्यानुसार योग्य कारवाई होईल, याची मला खात्री आहे. पण,  यावेळी लोकांनी पुढे येऊन सिस्टम बदलण्याची गरज आहे.' अश्विननं पुढे म्हंटलं आहे की, ' पीएसबीचा माझी विद्यार्थी म्हणूनच नाही तर दोन मुलींचा बाप म्हणून देखील गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहे. शाळेतील शिक्षकाच्या अटकेचे प्रकरण समोर आले आहे. ते पाहून आपल्याला भविष्यात आपल्या आजूबाजाला या प्रकराच्या घटना होऊ न देण्यासाठी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अश्विन सध्या मुंबईत आर. अश्विनने घरातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. त्यामुळे तो सध्या मुंबईत क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अश्विन संपूर्ण टीमसोबत 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Chennai, R ashwin, School, Sexual assault

    पुढील बातम्या