IND vs ENG : ... म्हणून अश्विननं मागितली हरभजनची माफी, पाहा VIDEO

IND vs ENG : ... म्हणून अश्विननं मागितली हरभजनची माफी, पाहा VIDEO

आर.अश्विनच्या (R. Ashwin) भेदक माऱ्यामुळे इंग्लंडची पहिली इनिंग 134 रनवरच संपुष्टात आली. या चांगल्या कामगिरीनंतर पत्रकारांशी बोलताना अश्विननं हरभजन सिंगची (Harbhajan Singh) माफी मागितली आहे.

  • Share this:

चेन्नई, 15 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये आर. अश्विननं (R. Ashwin) पुन्हा एकदा जादू दाखवली आहे. भारताच्या या अनुभवी ऑफ स्पिनरनं इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या. अश्विनच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडची पहिली इनिंग 134 रन्सवरच संपुष्टात आली. या चांगल्या कामगिरीनंतर पत्रकारांशी बोलताना अश्विननं हरभजन सिंगची (Harbhajan Singh) माफी मागितली आहे.

काय घडलं कारण?

आर. अश्विननं चेन्नई टेस्टच्या दुसऱ्या दिवशी एक खास रेकॉर्ड केला. अश्विननं बेन स्टोक्सला आऊट करताच भारतीय मैदानावर 266 विकेट्स पूर्ण केल्या. त्याचबरोबर त्यानं हरभजन सिंगला मागं टाकलं. हरभजननं भारतीय मैदानार 28.76 च्या सरासरीनं 265 विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विन मॅच संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला, “ मी 2001 च्या मालिकेत ‘भज्जी पा’ ला (हरभजन) खेळताना पाहिलं होतं. त्यावेळी मी ऑफ स्पिनर म्हणून देशासाठी खेळेल असं कधीच वाटलं नव्हतं. तेंव्हा मी राज्य स्तरावर क्रिकेट खेळत होतो आणि एक बॅट्समन म्हणून मला करिअर करण्याची इच्छा होती. अश्विननं आजवर 76 टेस्टमध्ये 25.26 च्या सरासरीनं 391 विकेट्स घेतल्या आहेत. हरभजनचा रेकॉर्ड आपण मोडल्याचं मला माहिती नव्हतं, असंही त्याने सांगितले.

( वाचा : IND vs ENG : अश्विनची डबल सेंच्युरी, हा विक्रम करणारा जगातला पहिलाच खेळाडू )

मित्र उडवत होते थट्टा!

आर. अश्विननं यावेळी त्याच्या सुरुवातीच्या काळातील आठवणही सांगितली. “मी हरभजन सारखी बॉलिंग करत होतो. त्यामुळे मित्र माझी थट्टा करत असत. त्या दिवसानंतर आज मी हरभजनचा रेकॉर्ड मोडला आहे. हे खरंच अविश्सनीय आहे. मला याबद्दल माहिती नव्हतं. आता मला याची माहिती झाल्यावर आनंद होत आहे, भज्जी पा मला माफ करा.’’

अश्विननं तब्बल 29 वेळा एका इनिंगमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्यानं सात टेस्टमध्ये 10 किंवा त्या पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. आता भारतीय पिचवर सर्वात जास्त विकेट्स मिळवण्याच्या यादीमध्ये अनिल कुंबळेच फक्त त्याच्या पुढं आहे. कुंबळेनं 24.88 च्या सरासरीनं 350 विकेट्स घेतल्या आहेत.

Published by: News18 Desk
First published: February 15, 2021, 9:41 AM IST

ताज्या बातम्या