IND vs AUS : ...तर रोहितचं खेळणं कठीण, रवी शास्त्रींनी व्यक्त केली चिंता

टीम इंडिया (Team India) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. यावेळी टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या खेळण्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

टीम इंडिया (Team India) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. यावेळी टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या खेळण्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

  • Share this:
    सिडनी : आयपीएल (IPL 2020) दरम्यान मुंबई (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि दिल्ली (Delhi Capitals) चा फास्ट बॉलर इशांत शर्मा (Ishant Sharma) यांना दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे इशांत शर्मा आयपीएलमधून बाहेर झाला होता, तर रोहित चार मॅच विश्रांती घेऊन पुन्हा खेळला होता. या दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती, पण नंतर वाद झाल्यावर रोहितला टेस्ट टीममध्ये निवडण्यात आलं. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया (Team India) दुबईवरून थेट ऑस्ट्रेलियाला रवाना झाली, पण रोहित मात्र भारतात परतला. रोहितच्या दुखापतीवर सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये उपचार सुरू आहेत. ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी रोहित आणि इशांत एनसीएमध्ये जोरदार तयारी करत आहेत, पण या दोघांच्या ऑस्ट्रेलियात खेळण्याविषयी संशय आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एबीसी स्पोर्ट्सशी याबाबत चर्चा केली. रोहित आणि इशांत शर्माला पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हावं लागेल, अन्यथा त्यांचं खेळणं कठीण होईल, अशी भीती रवी शास्त्रींनी व्यक्त केली. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार एबीसी स्पोर्ट्सशी बोलताना शास्त्री म्हणाले, 'आपला फिटनेस सिद्ध करण्यासाठी रोहितला एनसीएमध्ये काही टेस्ट द्यावा लागतील. तेव्हाच त्याला फिट व्हायला किती वेळ लागेल, ते कळेल. रोहितला तिकडे जास्त वेळ लागला, तर मात्र गोष्टी कठीण होतील. यानंतर क्वारंटाईनही बघावं लागेल. जर तो टेस्ट सीरिजसाठी शेवटच्या क्षणी ऑस्ट्रेलियात पोहोचला, तर त्याचं खेळणं कठीण होईल.' रोहितची वनडे आणि टी-20 सीरिजसाठी रोहितची निवड न होण्यावरही शास्त्रींनी भाष्य केलं. रोहितला किती आराम द्यायची गरज आहे, हे पाहणंही गरजेचं आहे. कोणत्याही खेळाडूला जास्त वेळ आराम देता येणार नाही, अशी प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी दिली.
    Published by:Shreyas
    First published: