Home /News /sport /

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवर रवी शास्त्रींचा मोठा खुलासा, म्हणाले...

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवर रवी शास्त्रींचा मोठा खुलासा, म्हणाले...

महेंद्रसिंह धोनीनं 2014 साली अचानक टेस्ट क्रिकेटला अलविदा (MS Dhoni Retirement) केला होता. तेव्हा टीम इंडियाचे 'डायरेक्टर ऑफ क्रिकेट' असलेल्या रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या निर्णयावर मोठा खुलासा केला आहे.

    मुंबई, 27 डिसेंबर:  टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नेहमी धक्कादायक निर्णयांसाठी ओळखला जातो. धोनीनं 2014 साली अचानक टेस्ट क्रिकेटला अलविदा (MS Dhoni Retirement) केला होता. त्यावेळी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. तेव्हा टीम इंडियाचे 'डायरेक्टर ऑफ क्रिकेट' असलेल्या रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी धोनीच्या निवृत्तीवर मोठा खुलासा केला आहे. रवी शास्त्रींनी 'स्टार स्पोर्ट्स' शी बोलताना सांगितलं की, 'मेलबर्न टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर धोनी त्यांना भेटायला आला होता. त्याला प्रेस कॉन्फरन्ससाठी जायचं होतं. धोनीनं जाण्यापूर्वी मला सांगितलं की, रवी भाई मी परत येईन तेव्हा मला टीममधील सर्व खेळाडूंशी बोलायचं आहे. मला वाटलं धोनी मॅचबद्दल खेळाडूंशी बोलणार आहे. पण धोनीनं निवृत्तीची घोषणा केली तेव्हा बहुतेक खेळाडूंना धक्का बसला होता. तो या प्रकारचा निर्भिड आणि निस्वार्थी व्यक्ती आहे.' विराट कोहली टीमची कॅप्टनसी करण्यासाठी तयार असल्याचं लक्षात आल्यानंतर धोनीनं हा निर्णय घेतला, असे शास्त्रींनी सांगितले. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 60 टेस्ट खेळल्या. त्यापैकी 27 टेस्टमध्ये भारतीय टीमनं विजय मिळवला. एक खेळाडू म्हणून धोनी 90 टेस्ट खेळला. त्यामध्ये त्यानं 38.09 च्या सरासरीनं 4876 रन केले. यामध्ये 4 शतक आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. Ashes Series: इंग्लंडच्या बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाला रोखलं, मेलबर्न टेस्टमधील रंगत वाढली यापूर्वी रवी शास्त्री यांनी आपण धोनीला निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली होती, असा खुलासा केला होता.  Stargazing: The players in my life या त्यांच्या पुस्तकात शास्त्रींनी हा खुलासा केला आहे. धोनी तेव्हा टीम इंडियातील सर्वात फिट 3 खेळाडूंपैकी एक होता. त्याला टेस्ट करिअर आणखी चांगलं करण्याची संधी होती, असं मत शास्त्री यांनी या पुस्तकात व्यक्त केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, MS Dhoni, Ravi shastri

    पुढील बातम्या