प्रशिक्षक निवडीनंतर रवी शास्त्री म्हणाले, माझ्यासाठी एक गोष्ट कधीच बदलली नाही

टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदी रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 01:50 PM IST

प्रशिक्षक निवडीनंतर रवी शास्त्री म्हणाले, माझ्यासाठी एक गोष्ट कधीच बदलली नाही

अँटिगुआ, 18 ऑगस्ट : भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली. न्यूझीलंडच्या माइक हेसन यांना मागे टाकून रवी शास्त्री यांनी बाजी मारली. प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत रवी शास्त्री म्हणाले की, विजयासाठी आव्हानांचा सामना करावा लागतो आणि ते आवडतं.

रवी शास्त्री यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, कोणत्याही वयात तुम्ही प्रत्येक जबाबदारी आव्हान म्हणून पेलत असता. त्यामुळं तुम्ही शर्यतीत कायम असता. विजय मिळवायचा असेल तर आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामधूनच प्रेरणा मिळते. माझ्यासाठी ही एक गोष्ट आहे जी कधी बदलली नाही. एक संघ जो तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांना वाटत असतं की प्रत्येकासाठी समान जागा असावी. मला चांगल्या आव्हानांना सामोरं जायला आवडतं असंही रवी शास्त्री म्हणाले.

क्रिकेट माझ्यासाठी नेहमीच वरच्या स्थानी राहिलं आहे. इतका काळ झाला की मला आठवत नाही एक आठवडा किंवा महिना असा गेला असेल की क्रिकेटपासून मी दूर गेलो आहे. हा खेळच माझं आयुष्य झाला आहे. माझ्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली ती पेलली. बीसीसीआयनं माझ्यावर ज्या पद्धतीनं विश्वास ठेवला तो मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला.

कपिल देव यांच्या प्रशासकिय समितीनं पत्रकार परिषद घेत रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली. भारतीय संघाच्या प्रशिक्षकासाठी शेवटी टॉम मूडी, माईक हेसन आणि रवी शास्त्री या तिघांमध्ये स्पर्धा रंगली होती. त्यात रवी शास्त्री यांना जास्त गुण मिळाल्यामुळं प्रशिक्षकपदी त्यांची निवड करण्यात आली.

2017मध्ये रवी शास्त्री पहिल्यांदा भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले होते. दरम्यान भारतीय संघानं आशियाई चषक वगळता इतर कोणती मोठी स्पर्धा जिंकली नसली तरी, रवी शास्त्री संघात कायम राहिल्यामुळं भारतीय संघाला फायदा होऊ शकतो.

Loading...

प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला होता. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर भारतीय संघानं नमवलं. जुलै 2017मध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 21 कसोटी सामने खेळले त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला. मात्र रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. तरी, आशियाई कप, ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय आणि भारताचे आयसीसी रॅकिंग यामुळं रवी शास्त्रींचा पुन्हा विचार करण्यात आला.

VIDEO: पाणीपुरीत सापडल्या जिंवत अळ्या, पोलखोल होताच विक्रेता फरार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 18, 2019 01:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...