Home /News /sport /

विराट कोहली नाही तर 'हा' आहे टीम इंडियाचा किंग! रवी शास्त्रींनी दिलं प्रशस्तीपत्रक

विराट कोहली नाही तर 'हा' आहे टीम इंडियाचा किंग! रवी शास्त्रींनी दिलं प्रशस्तीपत्रक

टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपणार आहे.

    मुंबई, 3 ऑक्टोबर : टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन झाल्यानंतर शास्त्रींची  हेड कोच म्हणून नियुक्ती झाली. शास्त्री आणि कोहली यांच्यातील केमेस्ट्री ही संपूर्ण क्रिकेट विश्वाला माहिती आहे. या जोडीनं टीम इंडियाला देशात तसंच परदेशात अनेक विजय मिळवून दिले. या सर्व इतिहासानंतरही रवी शास्त्रींनी मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा बेस्ट कॅप्टन म्हणून विराटच नाही तर महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) नाव घेतलं आहे. 'फॅन कोड' शी बोलताना शास्त्री यांनी सांगितले की, 'कॅप्टनसी ही एक कला असेल तर महेंद्रसिंह धोनी यामधील वरिष्ठ कलाकार आहे. त्यानं व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये नवे रेकॉर्ड केले आहेत. क्रिकेटचा इतिहास त्याच्या गोष्टींनी भरला आहे. ज्या लोकांनी त्याला जवळून पाहिलंय त्या सर्वांनीच धोनीपेक्षा चांगला कॅप्टन कुणी नसल्याचं मान्य केलं आहे. एक कॅप्टन म्हणून त्यानं सर्व काही सिद्ध केलं आहे. त्याचा रेकॉर्ड याची साक्ष आहे. धोनी आजवरचा सर्वात महान व्हाईट बॉल क्रिकेटमधील कॅप्टन आहे. आयसीसी स्पर्धेतील त्याचा रेकॉर्ड पाहिला तरी हे समजते. आयपीएल, चॅम्पियन्स लीग, सर्व आयसीसी स्पर्धा, दोन वर्ल्ड कप हे सर्व त्यानं जिंकलं आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या जवळ कुणीही नाही. तो सर्वात महान आहे. द किंग कॉन, म्हणूनही तुम्ही त्याला हाक मारु शकता.' राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीला जाणवली 'या' दोघांची कमतरता, म्हणाला... रवी शास्त्री पुढे म्हणाले की, 'धोनीचा शांत स्वभाव आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची त्याची क्षमता त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते. चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन म्हणून तुम्ही त्याला मैदानात पाहा. सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहेत, असे जाणवते.' गंभीरचा पुन्हा एकदा 'फिनिशर' धोनीवर निशाणा, माहीचे चाहते भडकले महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं या आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत 12 पैकी 9 सामने जिंकले असून आयपीएल 'प्ले ऑफ' साठी पात्र झालेली ती पहिली टीम आहे. या आयपीएलनंतर लगेच होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून काम करणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, MS Dhoni, Ravi shastri

    पुढील बातम्या