राशिद खानचा विश्वविक्रम, दिग्गज कर्णधारांनाही जमली नाही 'अशी' ऐतिहासिक कामगिरी

अफगाणिस्तानने राशिद खानच्या नेतृत्वाखाली विजय मिळवून क्रिकेटच्या 140 वर्षांच्या इतिहासात झाली नाही अशी कामगिरी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 11:13 AM IST

राशिद खानचा विश्वविक्रम, दिग्गज कर्णधारांनाही जमली नाही 'अशी' ऐतिहासिक कामगिरी

चटग्राम, 10 सप्टेंबर : अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्द कसोटी सामन्यात विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ दुसऱ्यांदा असे झाले आहे की एखाद्या संघाने त्यांच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातच विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने वेगळाच इतिहास रचला आहे. सर्वात कमी वयात नेतृत्व करताना त्यानं पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम केला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने 224 धावांनी विजय मिळवला.

राशिद खान पहिला कसोटी विजय मिळवणारा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहेत. तसेच तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे ज्याने पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक आणि 10 पेक्षा जास्त विकेट घेतल्या. राशिद खानला टी20 गोलंदाज मानलं जातं. मात्र, त्यानं पहिल्या कसोटी जबरदस्त कामगिरी करताना या प्रकारातही स्वत:ला सिद्ध करू शकतो असा दावा केला आहे.

राशिदनं आतापर्यंत फक्त 3 कसोटी खेळल्या आहेत. यामध्ये 3 वेळा एकाच डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध त्यानं दोन्ही डावात पाच विकेट घेतल्या आहेत.

तिसऱ्या कसोटी सामन्यात केलेल्या कामगिरीसह राशिद खान इमरान खान, अॅलन बॉर्डर यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. राशिदनं कर्णधार म्हणून तिसऱ्या कसोटी सामन्यात 11 विकेट घेतल्या. पहिल्या डावात अर्धशतक केलं. याआधी अशी कामगिरी अॅलन बॉर्डर आणि इमरान खान यांनी केली होती.

जागतिक क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षण; 140 वर्षानंतर प्रथमच असं घडलं!

Loading...

VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rashid
First Published: Sep 10, 2019 11:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...