मुंबई, 16 ऑगस्ट : अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान (Rashid Khan) सध्या इंग्लंडमध्ये 'द हंड्रेड' ही स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत राशिद संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं 6 मॅचमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत. राशिद सध्या इंग्लंडमध्ये असला तरी त्याचे कुंटुंब हे अफगाणिस्तानमध्ये अडकले आहे. अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला असून त्यामुळे त्याला सध्या कुटुंबाची चिंता सतावत आहे.
राशिद खाननं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याची व्यथा मांडली होती. राशिद गेल्या 5 वर्षात फक्त 25 दिवस घरी राहू शकला आहे. गेल्या तीन वर्षात त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं आहे. 'मला कुटुंबासोबत राहण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. ही माझ्या करिअरची सुरुवात आहे. त्यामुळे मला संघर्ष करावा लागतोय' असं राशिद म्हणाला होता. त्यानं सर्वांना शांततेचं आवाहन देखील केले होते.
The ongoing war in Afghanistan has led to humanitarian crisis. Please support @RashidKhanFund & @Afghan_cricketA emergency online fundraiser to provide basic essentials to those affected by the conflict. Link below ⬇️ https://t.co/6AoUdDABty
— Rashid Khan (@rashidkhan_19) August 10, 2021
द हंड्रेड स्पर्धेत नॉर्दन सुपरचार्जर्स टीमकडून खेळत असलेला राशिद खानचा सहकारी समित पटेलनं दिलेल्या माहितीनुसार,'राशिद सध्या नेहमीप्रमाणे आनंदी नाही. त्याची व्यथा आम्ही समजू शकतो. क्रिकेटमुळे त्याचं लक्ष थोडं दुसरिकडं जातं. या परिस्थितीमध्येही तो मॅच विनिंग खेळी करत आहे. खेळात आजही राशिदचं 100 टक्के योगदान आहे.'
बाहेर पडण्याचा मार्ग बंद
इंग्लंडचा माजी कॅप्टन केविन पीटरसननं स्काय स्पोर्ट्सवरील कॉमेंट्री दरम्यान राशिदची परिस्थिती सांगितली आहे. 'राशिद खानच्या कुटुंबात खूप काही घडतंय. माझी त्याची सविस्तर चर्चा झाली. तो सध्या काळजीत आहे. अफगाणिस्तानमधून कुटुंबाला बाहेर काढण्याचा मार्ग बंद आहे. या सर्व दबावानंतरही तो या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. ही खरोखच मन हेलावून टाकणारी गोष्ट आहे.' असं पीटरसननं सांगितलं.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान राज परतल्यानं BCCI ची वाढली काळजी, जाणून घ्या कारण
राशिद खान हा अफगाणिस्तानचा सर्वात यशस्वी क्रिकेटपटू आहे. तो जगभरातील टी20 लीगमध्ये खेळतो. 2015 साली पदार्पण केल्यानंतर टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याही बॉलरनं त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतलेल्या नाहीत. तो आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद टीमचा सदस्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban