Home /News /sport /

Ranji : क्रिकेटच्या पिचवर क्रीडा मंत्री फेल, सलग दुसऱ्या मॅचमध्ये निराशा

Ranji : क्रिकेटच्या पिचवर क्रीडा मंत्री फेल, सलग दुसऱ्या मॅचमध्ये निराशा

टीम इंडियाचा क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwary) आता क्रीडा मंत्री आहेत. बंगाल राज्यातील क्रीडा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतरही त्यांनी क्रिकेट खेळणे सोडलेलं नाही.

    मुंबई, 25 फेब्रुवारी : टीम इंडियाचा क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwary) आता क्रीडा मंत्री आहेत. मागच्या वर्षी झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी त्यांना मंत्रीपद सोपवले आहे.  बंगाल राज्यातील क्रीडा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतरही त्यांनी क्रिकेट खेळणे सोडलेलं नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) त्यांनी नाव नोंदवले होते. पण, त्यावेळी एकाही टीमनं त्यांच्यात रस दाखवला नाही. त्यानंतर रणजी स्पर्धेतही त्यांना निराशा सहन करावी लागत आहे. बंगाल विरूद्ध हैदराबाद यांच्यातील रणजी ट्रॉफी मॅचमध्ये तिवारीची बंगाल टीम (Bengal Cricket Team) पहिल्या इनिंगमध्ये 242 रन काढून ऑल आऊट झाली.  बंगालच्या एकाही बॅटरला 40 पेक्षा जास्त रन करता आले नाहीत. मनोज तिवारी तर फक्त 2 रन काढून आऊट झाले. तिवारी यांची ही 127 वी फर्स्ट क्लास मॅच आहे. त्यांनी 12 वन-डे आणि 3 टी20 इंटरनॅशनलमध्येही टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. SA vs NZ : 14 वर्षाांच्या प्रतीक्षेनंतर मिळाली संधी, दुसऱ्याच टेस्टमध्ये झळकावलं शतक बंगालच्या रणजी टीमनं या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये बडोद्याचा 4 विकेट्सनं पराभव केला होता. या मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये तिवारी शून्यावर आऊट झाले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 37 रनची उपयुक्त खेळी केली होती. बडोद्यानं बंगलासमोर विजयासाठी 349 रनचे आव्हानात्मक टार्गेट दिले होते. ते बंगालनं 92 ओव्हर्समध्येच पूर्ण केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Hyderabad, Sports, West bengal

    पुढील बातम्या