मुंबई, 30 डिसेंबर : रणजी क्रिकेट स्पर्धेतील (Ranji Trophy) सर्वात यशस्वी टीम असेल्या मुंबईने पहिल्या दोन मॅचसाठी टीमची (Mumbai Cricket Team) घोषणा केली आहे. 41 वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या मुंबईचा 9 टीमसह 'एलीट ग्रुप सी' मध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबईची पहिली लढत 13 जानेवारी रोजी महाराष्ट्राविरुद्ध होणार आहे. या टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) निवड करण्यात आली आहे. अर्जुनची यावर्षीच्या आयपीएल सिझनमध्ये मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) निवड केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच त्याची मुंबईच्या फर्स्ट क्लास टीममध्ये निवड झाली आहे.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पहिल्या दोन मॅचसाठी मुंबई टीमचा कॅप्टन असेल. पृथ्वी आणि अर्जुनसह, तरूण ओपनर यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान,. अरमान जाफर, आकर्षित गोमेल आणि अनुभवी विकेट किपर-बॅटर आदित्य तारेचा 20 सदस्यीय टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
अर्जुन तेंडुलकर हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा आहे. त्याची मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) यंदा टीममध्ये निवड केली होती, पण त्याला एकही मॅच खेळायला मिळाली नाही. तो दुखापतीमुळे यूएईमध्ये झालेल्या आयपीएल सिझनमधून बाहेर होता. 22 वर्षांच्या ऑलराऊंजर अर्जुननं आजवर 2 टी20 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 3 विकेट्स घेतल्या असून 3 रन काढले आहेत. यावर्षी कोरोनामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले नव्हते.
मुंबई क्रिकेट पुन्हा वादात, नातेवाईकांना कोच आणि ट्रेनर केल्यामुळे दोन सदस्यांचं निलंबन
मुंबईची रणजी टीम: पृथ्वी शॉ (कॅप्टन), यशस्वी जायसवाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तारे (विकेटकीपर), हार्दिक तमोर (विकेटकीपर), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, शशांक अटारडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बडियानी, सिद्धार्थ राऊत, रोयस्टन डायस आणि अर्जुन तेंदुलकर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun Tendulkar, Mumbai, Prithvi Shaw, Sachin tendulkar