मुंबई, 18 मे : आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धेत रंगत येण्यासाठी काही बदल करण्याचा निर्णय बीसीसीआय घेण्याची शक्यता आहे. यामध्ये नाणेफेक, डीआरएसबाबतच्या सूचना रणजी संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधारांनी बीसीसीआयने आयोजित केलेल्या परिषदेत दिल्या आहेत.
नाणेफेक न करता पाहुण्या संघाला प्रथम गोलंदाजी किंवा फलंदाजीचा घेण्याचा अधिकार देण्याच यावा अशा सूचना कर्णधार आणि प्रशिक्षकांनी बीसीसीआयला दिली आहे. याशिवाय डीआरएसचा वापर व्हावा असंही त्यांनी सुचवलं आहे.
वाचा : जग्गजेत्यांना दिला जातो खोटा चषक; World Cup बद्दलच्या कधीही न ऐकलेल्या 5 गोष्टी
गेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत पंचांच्या चुकीचा फटका संघांना बसला होता. त्यामुळे देशांतर्गत होणाऱ्या सामन्यातही त्याचा वापर करण्याची मागणी केली जात आहे. परिषदेत उपस्थित रणजीचे प्रशिक्षक आणि कर्णधारांनी डीआरएस महत्त्वाचे असल्याचे सांगत याचा रणजीत वापर व्हावा असं म्हटलं आहे.
VIDEO: भारतीय हवाई दल प्रमुखांकडून मिग 21 विमानाचं यशस्वी उड्डाण