मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तान क्रिकेटला मिळणार नवा बॉस, वशिल्याचा क्रिकेटपटू म्हणून झाली होती टीका

पाकिस्तान क्रिकेटला मिळणार नवा बॉस, वशिल्याचा क्रिकेटपटू म्हणून झाली होती टीका

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) लवकरच नवा बॉस मिळणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि बोर्डाचे संरक्षक इम्रान खान (Imran Khan) यांनी विद्यमान संचालक एहसान मनी यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 जून : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) लवकरच नवा बॉस मिळणार आहे. क्रिकेट बोर्डाच्या संचालकपदासाठी माजी कॅप्टन आणि कॉमेंटेटर  रमीज राजाचे  (Ramiz Raja) नाव सर्वात आघाडीवर आहे. राजानं या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, मीडिया रिपोर्टनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान आणि बोर्डाचे संरक्षक इम्रान खान (Imran Khan) यांनी विद्यमान संचालक एहसान मनी यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. मनी यांचा कार्यकाळ या महिन्यामध्ये संपत आहे.

पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'येत्या काही दिवसांमध्ये इम्रान खान पीसीबी कार्यकारी बोर्डाला संचालक पदासाठी दोन नावांची शिफारस करतील. यापैकी एकाची संचालकपदी नियुक्ती होईल. या नावांमध्ये रमीज राजाचे नाव असल्याची चर्चा आहे. मात्र या माहितीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.

रमीज राजा यापूर्वी वादग्रस्त ठरला होता. माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफला त्यानं बोगस मुसलमान म्हंटले होते. त्यावर युसूफनं राजा हा वशिल्याचा क्रिकेटपटू असल्याचा आरोप केला होता.

Happy Raksha Bandhan: प्रसिद्धीपासून नेहमी दूर असते विराट कोहलीची बहीण, भावाचा आहे खंबीर आधार!

रमीज राजानं त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये 57 टेस्ट आणि 198 आंतरराष्ट्रीय वन-डे सामने खेळले. त्याच्या नावावर टेस्टमध्ये 2 शतकांसह 2833 रन आहेत. त्याचबरोबर वन-डेमध्ये 9 शतक आणि 31 अर्धशतकांसह 58411 रन केले आहेत.

First published:

Tags: Cricket news, Pakistan Cricket Board