प्रामाणिकपणे काम करणे शक्य नाही; क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षाने दिला राजीनामा

रजत शर्मा (Rajat Sharma)यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: प्रामाणिकपणाशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्याची इच्छा नसल्याचे रजत शर्मा (Rajat Sharma)यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शर्मा यांनी शनिवारी तातडीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शर्मा यांनी अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे क्रिकेट क्रिकेट विश्वास एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात शर्मा यांनी माजी क्रिकेटपटू मदन लाल यांचा 517 मतांनी पराभव करत अध्यक्षपद मिळवले होते. शर्मा यांच्या कार्यकाळातच फिरोजशाह कोटला मैदानाचे नाव बदलून अरुण जेटली असे करण्यात आले होते. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाने शर्मा यांच्या राजीनाम्यासंदर्भातील ट्विट केले आहे. शर्मा यांचा राजीनामा उच्च समितीकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजीनाम्या संदर्भात खुद्द शर्मा यांनी देखील ट्विट केले आहे. ते म्हणतात, अस वाटते की प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम करण्याच्या माझ्या नियमांनुसार दिल्ली क्रिकेट बोर्डाचा कारभार करणे शक्य नाही. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा या दोन्ही गोष्टींशी मी कधीच तडजोड करू शक नाही.

कसोटीत 17 चेंडूत 55 धावा; या भारतीय गोलंदाजाने विराट,रोहितला टाकले मागे

16 नोव्हेंबर संपूर्ण देश भावूक झाला होता; जेव्हा गॉड ऑफ क्रिकेट...

शर्मा 20 महिने अध्यक्षपदावर होते. बोर्डाचे अध्यक्ष विनोद तिहाडा यांच्यासोबतचे त्यांचे मतभेद सार्वजनिक होते. बोर्डात नेहमी क्रिकेटच्या हिताविरुद्ध काम करणारे लोक सक्रिय आहेत, असे ही शर्मा यांनी म्हटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अरुण जेटली यांच्या पाठिंब्यानंतर शर्मा क्रिकेट प्रशासनात आले होते. जेटली यांच्या निधनानंतर शर्मा यांची बाजू थोडी कमकूवत झाली होती. बोर्डाचे कामकाज करताना विरोध आणि अडचणींचा सामना त्यांना करावा लागला होता.

First Published: Nov 16, 2019 05:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading