• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • भारतीय खेळाडूच्या वडिलांचं कोरोनानं निधन, IPL गाजवल्यानंतर कोसळला दु:खाचा डोंगर

भारतीय खेळाडूच्या वडिलांचं कोरोनानं निधन, IPL गाजवल्यानंतर कोसळला दु:खाचा डोंगर

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फास्ट बॉलर चेतन सकारियाचे (Chetan Sakariya) वडील कानजीभाई सकारिया (Kanjibhai Sakariya) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

 • Share this:
  भावनगर (गुजरात), 9 मे: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फास्ट बॉलर चेतन सकारियाचे (Chetan Sakariya) वडील कानजीभाई सकारिया (Kanjibhai Sakariya) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भावनगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर सकारिया देखील वडिलांची सेवा करण्यासाठी भावनगरमध्ये गेला होता. राजस्थान रॉयल्सनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. IPL ची कमाई खर्च करण्याची होती तयारी सकारिया यानं दोन दिवसांपूर्वी वडिलांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती.  राजस्थान रॉयल्सकडून मला काही दिवसांपूर्वीच पैसे मिळाले आहेत, हे माझं भाग्य आहे. मी ते पैसे घरी ट्रान्सफर केले आहेत. सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये याचा उपयोग होईल." त्यांच्या उपचारासाठी IPL ची सर्व कमाई खर्च करण्याची सकारियाची तयारी होती. "मी माझ्या वडिलांच्या चांगल्या उपचारासाठी क्रिकेट आणि IPL मधून मिळालेले पैसे देत आहे. ही स्पर्धा 1 महिना झाली नसती तर माझ्यासाठी खूप अवघड परिस्थिती होती. मी गरीब कुटुंबाचा सदस्य आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर टेंपो चालवला आहे. IPL मुळेच आमचं आयुष्य बदललं आहे," असं त्यानं सांगितलं होतं. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी CSK आघाडीवर, विराटपाठोपाठ धोनीची टीम करतेय मोठी मदत चेतन सकारियानं या आयपीएलमधील 7 मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं पहिल्याच मॅचमध्ये 3 विकेट्स घेत जोरदार पदार्पण केलं होतं. त्यानं या स्पर्धेत केएल राहुल, महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना या सारख्या दिग्गज बॅट्समन्सना आऊट केलं. पहिल्याच आयपीएलमध्ये त्यानं केलेल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं होतं. दुर्दैवानं त्याच्यावर आयपीएल स्पर्धा स्थगित होताच दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: