Home /News /sport /

IPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत? राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य

IPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत? राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) उद्रेकामुळे आयपीएल 2021 (IPL 2021) ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) मालक मनोज बडाले यांनी उर्वरित सिझनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

    मुंबई, 14 मे: कोरोना व्हायरसच्या (coronavirus) उद्रेकामुळे आयपीएल 2021 (IPL 2021) ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. या स्पर्धेतील 31 मॅच अजून बाकी आहेत. या सर्व मॅच कुठे आणि कधी घ्यायच्या याबाबत बीसीसीआय (BCCI) सध्या विचार करत आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) मालक मनोज बडाले यांनी उर्वरित सिझनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. या स्पर्धेचं नव्यानं वेळापत्रक तयार करणं हे आव्हानात्मक काम आहे, कारण बहुतेक आंतरराष्ट्रीय टीमनं भविष्यातील दौरे निश्चित केले आहेत, असं बडाले यांनी सांगितलं. बडाले यांनी यावेळी सांगितले की, "आयपीएल 2021 साठी वेळ निश्चित करणं हे आव्हानात्मक काम आहे. सर्व पूर्वीपासूनच खेळाडू बहुतेक क्रिकेट खेळत आहेत. Covid-19 मुळे हे वर्ष जास्त व्यस्त आहे. सर्व देशांचे क्रिकेट बोर्ड जास्तीत जास्त स्पर्धा आणि टेस्ट सीरिज खेळवण्याच्या प्रयत्नात आहेत. आयपीएलमधील उर्वरित मॅच ब्रिटन किंवा मध्यपूर्वेतील देशात होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपच्या पूर्वी किंवा नंतर या मॅच घेण्याचा प्रयत्न आहे, पण दुसऱ्या देशांचं व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता हे होणं कठीण आहे.'' इंग्लंडचे खेळाडू बाहेर आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांमध्ये इंग्लंडचे खेळाडू (England Players) सामील होणार नाहीत, असे संकेत इंग्लंडचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऍश्ले जाईल्स यांनी दिले आहेत.आयपीएलच्या उरलेल्या मॅच आणि इंग्लंडच्या ठरलेल्या सीरिज या एकाचवेळी होणार असल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे, असं ऍश्ले जाईल्स यांनी सांगितले आहे. मोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला.... न्यूझीलंडचा सहभाग अनिश्चित न्यूझीलंडची टीम सप्टेंबरमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन वन-डे आणि तीन T20 मॅचची ही सीरिज आहे. ही सीरिज फ्यूचर टूर प्रोग्रॅमचा (FTP) भाग आहे. ती रद्द किंवा स्थगित केली जाऊ शकत नाही. त्यामुळे आयपीएल स्पर्धेचा उत्तरार्ध सप्टेंबरमध्ये झाला तर न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Rajasthan Royals

    पुढील बातम्या