मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /स्टीवन स्मिथ आणि वाॅर्नरला सोडावं लागणार आयपीएल, सूत्रांची माहिती

स्टीवन स्मिथ आणि वाॅर्नरला सोडावं लागणार आयपीएल, सूत्रांची माहिती

स्टीवन स्मिथ राजस्थान राॅयल्सचा कप्तान आहे तर वाॅर्नर सनरायझर्स हैदराबादचा. स्मिथच्या जागी अजिंक्य रहाणेला कप्तानपद मिळण्याची शक्यता आहे.

    26 मार्च : केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाचा स्टीव्ह स्मिथनं  राजीनामा दिलाय. त्याच्या बरोबर उपकर्णधार डेव्हिड वाॅर्नरही पायउतार झालाय. आता दोघांनाही आयपीएल टीमचं कप्तानपदही सोडायला लागण्याची शक्यता आहे.

    स्टीवन स्मिथ राजस्थान राॅयल्सचा कप्तान आहे तर वाॅर्नर सनरायझर्स हैदराबादचा. स्मिथच्या जागी अजिंक्य रहाणेला कप्तानपद मिळण्याची शक्यता आहे. वाॅर्नरच्या जागी कोण हे अजून कळलं नाहीय.

    केप टाऊन इथे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचं कॅमेऱ्यात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनीतीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा  डागाळली आहे.

    First published:

    Tags: #David warner, Captain, Ipl 2018, Steven smith, आयपीएल 2018, डेव्हिड वाॅर्नर, स्टीवन स्मिथ