मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ठरलं! श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड कोच तर 'हा' असेल कॅप्टन

ठरलं! श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड कोच तर 'हा' असेल कॅप्टन

टीम इंडियाची (Team India) प्रमुख टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याचवेळी जुलै महिन्यात भारतीय क्रिकेट टीमची दुसरी फळी श्रीलंकेविरुद्ध वन-डे आणि टी20 मालिका खेळणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 जून : टीम इंडियाची (Team India) प्रमुख टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याचवेळी जुलै महिन्यात भारतीय क्रिकेट टीमची दुसरी फळी श्रीलंकेविरुद्ध वन-डे आणि टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) हा हेड कोच असेल, असे बीसीसीआयने निश्चित केले असल्याचं वृत्त 'क्रिकबझ'नं दिलं आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादामीचा (NCA) प्रमुख आहे. या अकादमीतील द्रविडचे सहकारी श्रीलंका दौऱ्यात सहाय्यक कोच म्हणून जाण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेच्या किमान एक आठवडा आधी टीम इंडिया श्रीलंकेत दाखल होईल. यापूर्वी या दौऱ्यावर जाणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी बंगळुरुमध्ये प्रशिक्षण शिबीर घेण्याचा बीसीसीआयचा विचार होता. मात्र देशातील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे तो विचार रद्द करण्यात आला आहे.

कॅप्टन कोण होणार?

तरुण खेळाडूंसह श्रीलंकेला जाणाऱ्या या टीमचा कॅप्टन म्हणून शिखर धवनची (Shikhar Dhawan) निवड ही जवळपास निश्चित आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमधून अजून पूर्णपणे बरा झालेला नाही, त्यामुळे अनुभवी धवन टीमचे नेतृत्व करेल.

बीसीसीआयकडून (BCCI) या दौऱ्याच्या तारखांची घोषणा करण्यात आली नसली तरी या स्पर्धेचे अधिकृत प्रसारणकर्ते असलेल्या टेन स्पोर्ट्सने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. सोनी टेन स्पोर्ट्सने केलेल्या ट्वीटनुसार 13 जुलैपासून या सीरिजला सुरुवात होईल, तर शेवटची मॅच 25 जुलैला खेळवली जाईल.

'इंग्लंडमध्ये वर्णद्वेष सहन केला', टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितला धक्कादायक अनुभव

टेन स्पोर्ट्सने सोशल मीडियावर या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक टाकलं आहे. त्यानुसार वनडे सीरिजपासून दौऱ्याला सुरुवात होईल. वनडे मॅच 13 जुलै, 16 जुलै आणि 18 जुलैला होतील. तर टी-20 स्पर्धा 21 जुलै, 23 जुलै आणि 25 जुलैला खेळवण्यात येतील. कोरोना व्हायरसमुळे सीरिजचे सगळे सामने एकाच स्टेडियममध्ये होणार असल्याचं सांगितलं जातंय. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये वनडे आणि टी-20 सीरिज होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

First published:

Tags: Cricket, India Vs Sri lanka, Rahul dravid, Shikhar dhawan