मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

म्हणून मुंबईची टीम IPL मध्ये सगळ्यात यशस्वी, द्रविडने सांगितलं कारण

म्हणून मुंबईची टीम IPL मध्ये सगळ्यात यशस्वी, द्रविडने सांगितलं कारण

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातही मुंबई (Mumbai Indians)चा विजय झाला. भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) याने मुंबईच्या यशस्वी असण्याचं कारण सांगितलं आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 14 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातही मुंबई (Mumbai Indians)चा विजय झाला. फायनलमध्ये मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)चा 5 विकेटने पराभव केला. मुंबईची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. आतापर्यंत सर्वाधिकवेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रमही मुंबईच्याच नावावर आहे. तसंच लागोपाठ दोन आयपीएल जिंकण्याच्या चेन्नईच्या रेकॉर्डशीही मुंबईने बरोबरी केली आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही मुंबईच्या टीमने दमदार कामगिरी केली. आयपीएल प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी मुंबई पहिलीच टीम ठरली, तसंच लीग स्टेजमध्येही मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली. भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) याने मुंबईच्या यशस्वी असण्याचं कारण सांगितलं आहे. 'आयपीएलमध्ये मुंबईची टीम यशस्वी असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, मुंबईने अनुभव आणि युवा खेळाडूंचा योग्य ताळमेळ बसवला आहे. मुंबईच्या टीममध्ये जगातले सर्वोत्तम टी-20 खेळाडू आहेत. सोबतच त्यांच्याकडे प्रतिभावान भारतीय खेळाडूही आहेत. असे प्रतिभावान खेळाडू शोधण्यासाठी त्यांनी चांगली यंत्रणा तयार केली आहे,' असं द्रविड म्हणाला. 'याआधी खेळाडूंना फक्त त्यांच्या राज्यांकडूनच खेळण्याची संधी मिळायची. पण आता आयपीएलमध्ये कर्नाटकचा खेळाडूही मुंबईकडून खेळू शकतो. या गोष्टी आता राज्य संघांच्या हातात नाहीत,' अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली. 'हरियाणाच्या टीमकडे युझवेंद्र चहल, अमित मिश्रा, जयंत यादव यांच्यासारखे चांगले स्पिनर आहेत, त्यामुळे राहुल तेवतियाला त्याच्या राज्याच्या टी-20 टीममध्ये संधी मिळाली नसती, पण आता त्याला त्याचं कौशल्य दाखवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आयपीएलच्या 8 टीम खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असतात,' असं वक्तव्य राहुल द्रविडने केलं. आयपीएलमध्ये 8 पेक्षा जास्त टीम असाव्या, कारण आणखी प्रतिभावान खेळाडूंना खेळण्याची आणि त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, असं द्रविडला वाटतं. 'न्यू इनिंग्ज' या आयपीएलच्या बिजनेस मॉडेलच्या पुस्तकाच्या अनावरणावेळी राहुल द्रविड बोलत होता. आयपीएलच्या राजस्थान टीमचे सहमालक बदाले यांचं हे पुस्तक आहे.
First published:

पुढील बातम्या