मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL बाबत द्रविडने व्यक्त केली ही खंत, टीम वाढवण्याच्या योजनेवरही प्रतिक्रिया

IPL बाबत द्रविडने व्यक्त केली ही खंत, टीम वाढवण्याच्या योजनेवरही प्रतिक्रिया

पुढच्या वर्षीच्या मोसमात आयपीएल (IPL)ची टीम वाढवण्याचा बीसीसीआय (BCCI)चा प्रयत्न आहे. 2021 साली 9 टीम आणि 2022 साली 10 टीमची आयपीएल खेळवण्याची बीसीसीआयची योजना आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) यानेही टीम वाढवण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 नोव्हेंबर : पुढच्या वर्षीच्या मोसमात आयपीएल (IPL)ची टीम वाढवण्याचा बीसीसीआय (BCCI)चा प्रयत्न आहे. 2021 साली 9 टीम आणि 2022 साली 10 टीमची आयपीएल खेळवण्याची बीसीसीआयची योजना आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) यानेही टीम वाढवण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलचा विस्तार व्हावा, त्यामुळे आणखी युवा आणि प्रतिभावान खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल, असं मत द्रविडने व्यक्त केलं आहे. तसंच सध्या कमी टीम असल्यामुळे अनेक युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधीच मिळत नसल्याची खंत द्रविडने बोलून दाखवली.

राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्स टीमचे सह-मालक मनोज बडाले यांचं पुस्तक 'अ न्यू इनिंग्ज' याचं ऑनलाईन लॉन्चिंग केलं. त्यावेळी आयपीएलच्या टीम वाढवण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, कारण यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडूंची नावं आणि चेहरे समोर आले आहेत, अशी प्रतिक्रिया राहुल द्रविडने दिली. राजस्थान टीमचे सह-मालक मनोज बडाले यांनीही द्रविडच्या या मताशी सहमत असल्याचं सांगितलं.

तेवतिया आयपीएलमुळेच दिसला

'आयपीएलमुळेच हरियाणाचा राहुल तेवतिया जगाला दिसला. याआधी खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये निवड होण्यासाठी राज्य संघावर अवलंबून होते. हरियाणासारख्या राज्यात युझवेंद्र चहल, अमित मिश्रा आणि जयंत यादव यांच्यासारख्या शानदार स्पिनरसमोर तेवतियाला कमी संधी मिळाल्या असत्या. आयपीएलमध्ये खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळता त्याचा अनुभव मिळतो. प्रशिक्षक म्हणून आम्ही युवा खेळाडूंना त्यांच्या प्रवासात मदत करू शकतो, पण यासाठी त्यांना अनुभवाची गरज लागतेच. तुम्ही देवदत्त पडिक्कलला विराट आणि एबी डिव्हिलियर्ससोबत खेळताना बघता, याचा त्याला नक्कीच फायदा होईल', असं वक्तव्य द्रविडने केलं.

First published: