'देवा, भारतीय क्रिकेटला वाचव', द्रविडला नोटीस पाठवल्यानंतर गांगुली BCCIवर भडकला

'देवा, भारतीय क्रिकेटला वाचव', द्रविडला नोटीस पाठवल्यानंतर गांगुली BCCIवर भडकला

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारताच्या क्रिकेटमध्ये नवी फॅशन आली असून आता देवच क्रिकेटला वाचवू शकतो असं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला बीसीसीआय़ने हितसंबंध आड येत असल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख आहे. त्याच्यावर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन सदस्य असलेल्या संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयच्या नियमांचं उल्लंघन करत हितसंबंध जपल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बीसीसीआय़कडून द्रविडला नोटीस पाठवण्यात आली होती.

द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत काम करतो. त्याशिवाय इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष असून या ग्रुपचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ खेळत आहे. याबद्दल राहुल द्रविडला मोटीस पाठवण्यात आली होती. हितसंबंध जपण्याच्या मुद्द्यावरून पाठवलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. त्याच्या उत्तरानंतर पुढच्या कारवाईवर विचार करण्यात येईल असं बीसीसीआय़कडून सांगण्यात आलं होतं.

द्रविडला 16 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे. त्यानंतर बीसीसीआय़चे लोकपाल डीके जैन यांच्यासमोर सुनावणीला हजर रहावं लागू शकतं. याशिवाय सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही यापूर्वी अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात आली होती.

बीसीसीआयनं द्रविडला नोटीस पाठवल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी राग व्यक्त केला आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कठोर शब्दांत टीका केली आहे. भारतीय क्रिकेटपटूमंध्ये नवीन फॅशन आली आहे. चर्चेत राहण्यासाठी हितसंबंधाचा प्रश्न पुढं आणणे हा सर्वोत्तम मार्ग बनत चालला आहे. देवा, भारतीय क्रिकेटला वाचव असंही गांगुलीने म्हटंल आहे.

भारताची द वॉल अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडला नोटीस पाठवल्याचं समजल्यानंतर भाराताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेसुद्धा बीसीसीआयवर हल्लाबोल केला आहे. भारतीय क्रिकेटला द्रविडसारखा चांगला माणूस मिळणार नाही. अशा प्रकारची नोटीस पाठवून द्रविडचा अपमान केला आहे. भारताच्या क्रिकेटला त्याची गरज आहे.

पंत ठरला फिनिशर, धोनीसारखा षटकार मारून जिंकला सामना

VIDEO : धोनी म्हणतो, मै पल दो पल का शायर... माझ्यापेक्षा चांगलं खेळणारा कोणीतरी येईल

========================================================

First published: August 7, 2019, 1:30 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading