VIDEO: टीम इंडियाच्या कोचनं केली रोनाल्डोची थट्टा, Coca Cola बॉटल पाहून म्हणाले...

पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर (R. Sridhar) चर्चेत आले. श्रीधर यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) याची थट्टा केली.

पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर (R. Sridhar) चर्चेत आले. श्रीधर यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) याची थट्टा केली.

  • Share this:
    साऊथम्पटन, 19 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा (WTC Final 2021) पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर (R. Sridhar) चर्चेत आले. श्रीधर यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) याची थट्टा केली. श्रीधर पत्रकार परिषदेला आले त्यावेळी टेबलवर कोका कोलाची बॉटल होती. भारताच्या फिल्डिंग कोचनं ती पाहून मजेत विचारले की मी ही बॉटल दुसरीकडं ठेवू का? याची काय किंमत असेल? माझ्यासाठी देखील ही बॉटल ठेवली आहे का? युरो कपमध्ये (Euro Cup 2020) हंगेरी विरुद्धची मॅच झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये  कोका कोलाची (Coca Cola) बॉटल हटवून तिकडे पाण्याची बाटली ठेवल्यानंतर पोर्तगुालचा क्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) जगभरात चर्चेत आला.रोनाल्डोच्या या कृतीमुळे कोका कोला कंपनीचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. रोनाल्डोने कोका कोला पिऊ नका, तर पाणी प्या असा संदेश चाहत्यांना दिला. रोनाल्डोच्या या कृतीने काही जणांनी सोशल मीडियावर इतरांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.  एका यूजरने श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटपटू महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) आणि कुमार संगकारा (Kumar Sangakara) यांच्यावर निशाणा साधला. पण महेला जयवर्धने याने या ट्रोलरला प्रत्युत्तर देत रोनाल्डोचीही पोलखोल केली. WTC Final : इंग्लंडमधून आली Good News, वाचा कधी सुरू होणार मॅच जयवर्धनेने या ट्रोलरला प्रत्युत्तर देत रोनाल्डोचा एक जुना फोटो शेयर केला. या फोटोमध्ये तो कोका कोलाचा प्रचार करताना दिसत आहे.
    Published by:News18 Desk
    First published: