विजयाच्या आधीच केला जल्लोष आणि 4 चेंडूत गमावला सामना

विजयाच्या आधीच केला जल्लोष आणि 4 चेंडूत गमावला सामना

  • Share this:

सुरत, 02 डिसेंबर: सैयद मुश्ताक अली टी-20 (Syed Mushtaq Ali Trophy)स्पर्धेच्या फायनलमध्ये कर्नाटकने तामिळनाडूवर एक धावांनी सनसनाटी विजय मिळवला आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. कर्नाटकने प्रथम फलंदाजीकरत 180 धावा केल्या होत्या. उत्तरादाखल तामिळनाडूला 20 षटकात 179 धावा करता आल्या. या सामन्या अखेरच्या षटकात तामिळनाडूला विजयासाठी 13 धावांची गरज होती. पण फिरकीपटू कृष्णप्पा गौतम यांने केवळ 11 धावा दिल्या आणि संघाला विजय मिळून दिला. या सामन्यातील अखेरच्या षटकात अशी एक घटना झाली ज्यामुळे आर.अश्विन (R Ashwin)ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर अश्विनची तुलना बांगलादेशचा विकेटकिपर मुशफिकुर रहिम याच्याशी केली जात आहे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी झाली टीम इंडियाची घोषण

अंतिम सामन्यात एक वेळ अशी होती की तामिळनाडूचा विजय सोपा वाटत होता. सामन्यात अखेरच्या 6 चेंडूत विजयासाठी 13 धावांची गरज असताना अश्विनने गौतमच्या पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारले. दुसरा चौकार मारताच अश्विनने जल्लोष करण्यास सुरुवात केली. अश्विनला वाटले की तामिळनाडूला विजेतेपदापासून आता कोणीच रोखू शकत नाही. पण प्रत्यक्षात झाले उटले. तामिळनाडूला अखेरच्या 4 चेंडूत 5 धावा करता आल्या नाहीत. त्यांनी फक्त 3 धावा केल्या आणि कर्नाटकने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

सामना जिंकण्याआधीच अश्विनने जल्लोष करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी अश्विनची तुलना बांगलादेशचा विकेटकिपर मुशफिकुर रहिम यांच्याशी केली. 2016च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्याआधीच त्याने जल्लोष केला होता. पण अखेरच्या क्षणी सामना फिरला आणि भारताने एक धावाने विजय मिळवला. अश्विन सोबत देखील असाच काहीचा प्रकार घडला.

त्सुनामीमध्ये नष्ट झालेल्या जंगलातील झाडांपासून तयार केले ऑलिंपिकचे स्टेडियम!

कर्नाटकने सलग दुसऱ्यांदा तामिळनाडूला अंतिम सामन्यात मात दिली आहे. याआधी विजय हजारे स्पर्धेच्या फायनलमध्ये कर्नाटकने तामिळनाडूचा पराभव केला होता. या विजयासह कर्नाटकने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी सलग दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

First published: December 2, 2019, 1:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading