नवी दिल्ली, 16 मे : कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धेला (IPL 2021) स्थगित करावे लागले. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात 60 पैकी 29 मॅच झाल्या आहेत. या कालावधीमध्ये अनेक तरुण खेळाडूंनी त्यांचा ठसा उमटवला आहे. यामध्ये पंजाब किंग्जचा (Punjab Kings) बॅट्समन शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा समावेश आहे. तामिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या शाहरुख खानचे अनिल कुंबळे (Anil Kumble) पासून वीरेंद्र सेहवागपर्यंत (Virendra Sehwag) अनेक जण फॅन्स आहेत. सेहवागनं शाहरुखची तुलना वेस्टइंडिजचा आक्रमक बॅट्समन कायरन पोलार्डशी (Kieron Pollard) केली आहे.
शाहरुख खानला पंजाब किंग्जनं 5.25 कोटींमध्ये खरेदी केलं आहे. या आयपीएलमध्ये त्याला डेथ ओव्हर्समध्ये बॅटींग करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यानं आकर्षक फटकेबाजी करत सर्वांचं लक्ष वेधलं. आयपीएल स्पर्धा स्थगित झाली नसती तर संजू सॅमसन (119), देवदत्त पडिक्कल (101) आण जोस बटलर (124) यांच्यासह आणखी एक शतक पाहयला मिळाले असते, असा दावा सेहवागनं केला आहे. शाहरुख खानला वरच्या क्रमांकावर बॅटींगला पाठवलं तर तो शतक लगावेल असा विश्वास सेहवागनं व्यक्त केला आहे.
आयपीएल 2021 मध्ये शाहरुख खाननं सात मॅचमध्ये अनुक्रमे 6*, 47, 15*, 22, 13, 0 आणि 4 रनची खेळी केली. त्यानंतरही सेहवागनं त्याची तुलना पोलार्डशी केली आहे. 'क्रिकबझ'शी बोलताना सेहवागनं सांगितले ती 'त्याचा खेळ पाहून मला तरुणपणीचा पोलार्ड आठवतो. त्याच्याकडं पोलार्डप्रमाणे जागेवर उभं राहून सिक्स मारण्याची क्षमता आहे.शाहरुखकडं योग्यता आहे. त्यानं छोट्या खेळी केल्या आहेत. मात्र तो जितका खाली बॅटींगला येईल त्याला तितकेच कमी बॉल खेळायला मिळतील.' असं सेहवागनं सांगितलं.
कोरोना विरुद्धच्या लढाईत होणार 'या' स्टेडियमचा वापर, सरकारपुढे प्रस्ताव सादर
शाहरुखला वरच्या क्रमांकावर बॅटींग करण्याची संधी मिळाली तर तो नक्की शतक करेल असा विश्वास सेहवागनं व्यक्त केलाय. तामिळनाडूच्या या बॅट्समननं आजवर व्यावसायिक क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेलं नाही. त्याचा फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर नाबाद 92 असून लिस्ट A क्रिकेटमधील नाबाद 69 आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kieron pollard, Punjab kings, Shahrukh khan, Virender sehwag