मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तानी क्रिकेटपटू पत्रकारावर संतापला! सर्वांसमोर झाली तू-तू मैं-मैं, पाहा VIDEO

पाकिस्तानी क्रिकेटपटू पत्रकारावर संतापला! सर्वांसमोर झाली तू-तू मैं-मैं, पाहा VIDEO

नेहमी वादामध्ये अडकणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू (Pakistan Cricketer) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता त्याने एका पाकिस्तानी पत्रकाराशी सर्वांसमोर वाद घातला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 डिसेंबर : पाकिस्तान क्रिकेट टीम  (Pakistan Cricket Team) टी20 वर्ल्ड कप आणि बांगलादेश दौरा करून मायदेशात परतली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धची टी20 मालिका (Pakistan vs West Indies T20 Series 2021) सोमवारपासून कराचीमध्ये सुरू होत आहे. या सीरिजच्या आदल्या दिवशी रविवारी पाकिस्तान सुपर लीगच्या सातव्या सिझनचा ड्राफ्ट (PSL -7 Draft) निश्चित झाला. या कार्यक्रमात पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) आणि एका पत्रकारामध्ये जोरदार वाद झाला.

पीएसएल 2022 चा ड्राफ्ट निश्चित झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हसन अली देखील उपस्थित होता. इस्लामाबाद युनायटेडचा खेळाडू असलेला हसन त्यांच्या टीम मॅनेजमेंटसोबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होता. त्यावेळी एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र हसन त्याला पाहताच भडकला आणि त्याने त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला.

या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे. अनस सईद असं या पत्रकाराचं नाव असून तो GNN या पाकिस्तानच्या चॅनलचा पत्रकार आहे. अनसने प्रश्न विचारताच हसननं त्याला उत्तर देणे टाळले आणि पुढचा प्रश्न विचारा असे वक्तव्य केले. त्यानंतर अनसने पुन्हा एकदा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण हसन अली त्याचं ऐकायला तयार नव्हता. यावेळी, दोघांमध्ये सर्वांसमोर वाद झाला.

'मला तुम्हाला उत्तर द्यायचं नाही. तुम्ही आधी ट्विटरवर चांगलं लिहा त्यानंतर मी उत्तर देईन. तुम्हाला कुणाबरोबरही पर्सनल होण्याची गरज नाही. पीसीबी तुम्हाला अडवू शकत नाही, पण आम्हाला अधिकार आहे.' असं सांगत हसन अलीने त्याला प्रश्न विचारू दिला नाही.

टी20 वर्ल्ड कपमधील सेमी फायनल मॅचमध्ये हसन अली महागडा ठरला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पराभवाला तो जबाबदार असल्याची टीका पाकिस्तानतील सोशल मीडियाने जोरदार केली होती.

'मला 'या' बाबतीत राहुल द्रविड मदत करेल', कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माला विश्वास

First published:

Tags: Cricket news, Pakistan, Video Viral On Social Media