मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PSL 6 मधील अडचणी कायम, पाकिस्तानच्या माजी कॅप्टनसह 11 जणांना विमानात प्रवेश नाकारला

PSL 6 मधील अडचणी कायम, पाकिस्तानच्या माजी कॅप्टनसह 11 जणांना विमानात प्रवेश नाकारला

कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेली पाकिस्तान सुपर लीग (PSL 6) आता युएईमध्ये होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • Published by:  News18 Desk
कराची, 31 मे: कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेली पाकिस्तान सुपर लीग (PSL 6) आता युएईमध्ये होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानचा माजी कॅप्टन सर्फराज अहमदसह (Sarfaraz Ahmed) 11 जणांना रविवारी अबूधबीच्या विमानात बसण्याची परवानगी नाकारण्यात आली. मार्चमध्ये पीएसएलमधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानं 14 मॅचनंतर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेतील 20 मॅच आणखी बाकी आहेत. 'क्रिकइन्फो'ने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी सकाळी सर्फराजसह 11 खेळाडू आणि अधिकारी लाहोर आणि कराचीहून दोहा मार्गे आबूधाबीला एका व्यावसायिक विमानाने जाणार होते. पण, त्यांना विमानात प्रवेश करण्याची संधी मिळाली नाही. सर्फराज हा क्वेटा गॅलेडिएटर्स टीमचा कॅप्टन आहे. त्या सर्वांना विमानात जाण्यापासून प्रवेश रोखल्याने हॉटेलमध्ये परतावे लागले. या गटातील फक्त पाच जणांना विमानानं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. यापूर्वी व्हिसाची योग्य कागदपत्रे नसल्यानं पीएसएलसंबंधी काही सदस्यांना यूएईमध्ये जाता आले नव्हते. कराची आणि लाहोरमधील 25 पेक्षा जास्त खेळाडूंना चार्टर्ड विमानाने यूएईमध्ये नेण्यात येणार होते. मात्र त्यानंतर पीसीबीने त्यांना व्यावसायिक विमानाने (commercial flight) नेण्याचा प्रस्ताव निवडला. त्यामुळे पीसीबीला या स्पर्धेसाठी लागू करण्यात आलेल्या कोव्हिड प्रोटोकॉलला रद्द करावे लागले. पीएसएलमधील उर्वरित सिझनमध्ये भाग घेण्यासाठी पाकिस्तानातून 202 खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि सामना अधिकारी यूएईमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व जण 27 मे रोजी चार्टर्ड विमानाने गेले आहेत. भारतामधून 25 जणांना या स्पर्धेसाठी यूएईचा व्हिसा देण्यात आला आहे. IPL 2021: जोफ्रा आर्चरचे 6 वर्षांपूर्वीचे ट्विट का होत आहे Viral?, वाचा कारण वेळापत्रक जाहीर नाही पीसीबी ही स्पर्धा 5 जूनपासून सुरु करण्याच्या तयारीत आहे. मात्र अद्याप याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. पाकिस्तानची टीम 22 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या वेळेत पीएसएल स्पर्धा झाली नाही तर उर्वरित सामने पुन्हा होणे अवघड आहे. पाकिस्तानची टीम इंग्लंड दौऱ्यावर तीन वन-डे आणि तीन टी20 मॅच खेळणार आहे. वन-डे सीरिजची सुरूवात 8 जुलै रोजी तर टी 20 सीरिज 16 जुलैपासून सुरू होणार आहे.
First published:

Tags: Cricket, Pakistan, Pakistan Cricket Board

पुढील बातम्या