लाहोर, 28 मे: पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) ज्या खेळाडूवर नियम तोडल्याचा ठपका ठेवत बडतर्फ केले होते तो खेळाडू आता पीएसल 6 (PSL 6) मधील उर्वरित सामने खेळण्यासाठी युएईमध्ये जाणार आहे. पीसीबीने यापूर्वी फास्ट बॉलर नसीम शाह (Naseem Shah) याला कोव्हिड 19 प्रोटॉकॉल तोडल्याच्या आरोपावरुन बडतर्फ केले होते. आता या निर्णयावरुन यू टर्न घेत त्याला लाहोरमधील बायो-बबलमध्ये प्रवेश दिला आहे.
नसीम शाहला पीसीबीने आयसोलेशनमध्ये ठेवले असून त्याची कोव्हिड टेस्ट केली जाणार आहे. बायो-बबलचा प्रोटोकॉल पूर्ण होताच तो यूएईला रवाना होईल. युएईला जाणाऱ्या तिसऱ्या चार्टर्ड विमानातून नसीम शाहा जाणार आहे. यापूर्वी गुरुवारी पीएएसल संबंधीत काही जण अबूधाबीला दाखल झाले आहेत. आता अन्य दोन विमानातून उर्वरित खेळाडू आणि स्टाफ जाणार आहे.
काय झाली होती चूक?
नसीम शाह त्याचा जुना RTPCR रिपोर्ट घेऊन लाहोरमधील हॉटेलमध्ये दाखल झाला होता. वास्तविक पीसीबीने सर्व खेळाडूंना 48 तासांच्या पूर्वीचा रिपोर्ट घेऊन येण्याची सूचना दिली होती. त्यानंतर पीसीबीच्या विशेष समितीनं नसीम शाहला तातडीने बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता.
IPL 2021 मधून 30 खेळाडू बाहेर? 'या' टीमना बसणार मोठा फटका
आता नसीम शाह पुन्हा एकदा लाहोरमधील हॉटेलमध्ये परतला आहे. त्याच्या आता दोन कोव्हिड टेस्ट होणार आहेत. यामध्ये तो निगेटिव्ह आढळल्यास युएईमध्ये रवाना होईल. नसीम हा क्वेटा ग्लॅडिएटर्सचा (Quetta Gladiators) फास्ट बॉलर आहे. या टीमचा अन्वर अली यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याच नसीमही युएईमध्ये गेला नाही तर टीमला मोठा फटका बसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.