Home /News /sport /

PSL 2022: PCB शी भांडणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूचे घूमजाव, आता म्हणाला...

PSL 2022: PCB शी भांडणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूचे घूमजाव, आता म्हणाला...

पाकिस्तान सुपर लीगच्या पुढील सिझनचा ड्राफ्ट (PSL 2022, Draft) जाहीर झाला आहे. या ड्राफ्टमध्ये अनेक खेळाडूंची श्रेणी बदलण्यात आली आहे. या ड्राफ्टवर पाकिस्ताच्या सिनिअर खेळाडूने नाराजी व्यक्त केली होती.

    मुंबई, 16 डिसेंबर : पाकिस्तान सुपर लीगच्या पुढील सिझनचा ड्राफ्ट (PSL 2022, Draft) जाहीर झाला आहे. या ड्राफ्टमध्ये अनेक खेळाडूंची श्रेणी बदलण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) या निर्णयावर विकेट किपर बॅटर कमरान अकमल (Kamran Akmal) याने नाराजी व्यक्त केली होती. कमरानचा सिल्व्हर श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर कमरानने या निर्णयावर टीका करत पीएसएल स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता 4 दिवसांमध्येच त्याने घूमजाव केले आहे. 'क्रिकइन्फो'नं दिलेल्या वृत्तानुसार कमराननं त्याची पीएसएल टीम पेशावर जाल्मी (Peshawar Zalmi) सोबत या प्रश्नावर तोडगा काढला आहे. 'माझ्यासाठी आत्म-सन्मान ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पैशांचा काही विषय नाही. पैशांचा प्रश्न असता तर मी पेशावरची टीम यापूर्वीच सोडली असती. ही टीम माझ्या कुटुंबासारखी आहे. मी ती सोडण्याचा कधीही विचार करू शकत नाही. या सर्व प्रक्रियेत सिनिअर खेळाडूंबद्दलची भूमिका आश्चर्यकारक होती. मला याचा खेद आहे.' असे कमरानने सांगितले. पेशावरच्या टीमनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्हाला कमरानचा मोठा आदर आहे. त्याला सिल्व्हर श्रेणीत ठेवणे हा आमच्या योजनेचा भाग होता. कोणत्या खेळाडूला कोणत्या टप्प्यावर खरेदी करायचं हे ड्राफ्टमध्ये निश्चित होते. आमच्याकडे 'राईट टू मॅच' (RTM) कार्ड होते. ते कार्ड आम्ही कमरानसाठी शिल्लक ठेवले होते, असे पेशावरच्या टीमने स्पष्ट केले आहे. काय घडले होते प्रकरण? पीएसएलच्या इतिहासात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कमरानचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही त्याला डिमोशन देण्यात आल्यानं तो नाराज झाला होता. या नाराजीतूनच स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 'मला कृपया रिलीज करा. मी या श्रेणीमध्ये खेळण्यासाठी योग्य नाही. खालची श्रेणी तरूण खेळाडूंसाठी योग्य आहे. मला पेशावरच्या टीमकडून कोणतीही सहानुभूती नको आहे. मी त्यांच्याकडून यापूर्वीचे सहा सिझन खेळलो आहे.' असे ट्विट कमरानने केले होते. त्या ट्विटनंतर चार दिवसांमध्येच त्याने घूमजाव करत पुढील सिझन पेशावरकडून खेळण्याचे मान्य केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या