इस्लामाबाद, 27 मे: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) स्थगित झालेली पाकिस्तान सुपर लीग (PSL 2021) स्पर्धा पूर्ण करण्याची तयारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सुरु केली आहे. उर्वरित स्पर्धा पाकिस्तानात न होता युएईमध्ये (UAE) होणार आहे. युएई सरकारशी दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर या स्पर्धेला सरकारने मंजुरी केली आहे, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिलासा मिळाला आहे.
युएई सरकारने पीएसएलला परवानगी दिली असली तरी, या स्पर्धेचा भाग असलेल्या 25 भारतीयांना व्हिसा मिळणार का? यावर कोणताही निर्णय झाला नव्हता, अखेर हा पेच मिटला आहे. युएई सरकारने परवानगी दिल्यानंतर या सर्वांना पाकिस्तान बोर्डाने या सर्व भारतीयांना व्हिसा जारी केला आहे. हे सर्व भारतीय ब्रॉडकास्टिंग टीमचे सदस्य आहेत.
पीसीबीने भारताच्या 25 जणांसह दक्षिण आफ्रिकेच्या 26 जणांना व्हिसा जारी केले आहेत. यामध्ये खेळाडू आणि स्टाफचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सदस्यांमध्ये फाफ ड्यू प्लेसिस, डेव्हिड मिल, रिली रोसेयू, कॅमरुन डेलपोर्ट, मायकल स्मिथ आणि हर्षल गिब्ज या खेळाडूंचा समावेश आहे. जे खेळाडू आणि अधिकारी 27 मे रोजी दुपारी 2 पर्यंत हॉटेलमध्ये दाखल होतील, त्यांचा क्वारंटाईन कालावधी सुरु झाला असे समजले जाईल, असे पीसीबीने स्पष्ट केले आहे.
आणखी 20 मॅच बाकी
पीसीबीने सहा फ्रँचायझीच्या जवळपास 233 खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना युएईमध्ये आणण्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली आहे. पीएसएलमधील आणखी 20 मॅच बाकी आहेत. या मॅच 6 जून ते 20 जून दरम्यान होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने 14 मॅचनंतर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. युएईमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे (IPL 2021) उर्वरित 31 सामने होणार अशी चर्चा आहे.
खेळाडूंसाठी खास व्यवस्था
पीएसएल स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खास व्यवस्था केली आहे. यामध्ये खेळाडू नारळ पाणी, बर्फाच्या कॉलरचे बनियान या उपायांचा समावेश आहे. युएईमधील उन्हाळ्याचा खेळाडूंना त्रास होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात येणार आहे. " युएईमधील हवामान फास्ट बॉलर्ससाठी अधिक त्रासदायक असेल. आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्याची योजना तयार करत आहोत." असे पेशावर जाल्मीचे मुख्य कोच मोहम्मद अक्रम यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.