भारताच्या अंडर-19 टीमचा कर्णधार प्रियम गर्गला नवी जबाबदारी

भारताच्या अंडर-19 टीमचा कर्णधार प्रियम गर्ग (Priyam Garg) याला नवी जबाबदारी मिळाली आहे. प्रियम गर्ग याची सैय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट चॅम्पियनशीप (Mushtaq Ali Trophy) साठी उत्तर प्रदेशचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारताच्या अंडर-19 टीमचा कर्णधार प्रियम गर्ग (Priyam Garg) याला नवी जबाबदारी मिळाली आहे. प्रियम गर्ग याची सैय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट चॅम्पियनशीप (Mushtaq Ali Trophy) साठी उत्तर प्रदेशचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Share this:
    लखनऊ, 12 डिसेंबर : भारताच्या अंडर-19 टीमचा कर्णधार प्रियम गर्ग (Priyam Garg) याला नवी जबाबदारी मिळाली आहे. प्रियम गर्ग याची सैय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट चॅम्पियनशीप (Mushtaq Ali Trophy) साठी उत्तर प्रदेशचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे मुख्य परिचालन अधिकारी दीपक शर्मा यांनी याबाबतची घोषणा केली आहे. याचसोबत लेग स्पिनर कर्ण शर्मा याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. बीसीसीआयने अजून सैयद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केलेली नाही. भारताच्या अंडर-19 चा कर्णधार प्रियम गर्गने यावर्षी आयपीएलच्या 13 व्या मोसमात सगळ्यांना प्रभावित केलं होतं. प्रियम गर्गला हैदराबादकडून खेळताना बॅटिंगची कमी संधी मिळाली. तो बॅटिंगसाठी खालच्या क्रमांकावर यायचा, पण मिळालेल्या संधीचं सोनं करत त्याने स्वत:ची प्रतिभा दाखवून दिली. प्रियम गर्गची आयपीएलमधली कामगिरी चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादने 69 रनवर 4 विकेट गमावल्या होत्या, त्यावेळी प्रियम गर्गने 26 बॉलमध्ये 51 रनची खेळी केली आणि टीमचा स्कोअर 5 विकेटवर 164 वर पोहोचवला. आयपीएलच्या 14 मॅचमध्ये त्याने 14.77 च्या सरासरीने आणि 119.81 च्या स्ट्राईक रेटने 133 रन केले. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये प्रियम गर्गची कामगिरी याआधी प्रियम गर्गने त्याच्या नेतृत्वात भारताला अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचवलं होतं. वर्ल्ड कपमध्ये प्रियम गर्गला फक्त तीनवेळाच बॅटिंगची संधी मिळाली होती. पहिल्या मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध प्रियम गर्गने 56 रनची खेळी केली होती. यानंतर जपान आणि न्यूझीलंडविरुद्ध त्याने बॅटिंग केली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये तो 5 रनवर आऊट झाला. पाकिस्तानविरुद्ध भारताच्या ओपनरनी केलेल्या कामगिरीमुळे प्रियम गर्गला बॅटिंग मिळाली नाही. फायनलमध्येही त्याला फक्त 7 रन करता आले. वडिलांच्या संघर्षानंतर झाला क्रिकेटपटू मेरठमध्ये जन्मलेल्या प्रियम गर्गने 2018 साली रणजी ट्रॉफीमधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात प्रियम गर्गने नाबाद शतक केलं होतं. वडिलांच्या संघर्षामुळे प्रियम गर्ग क्रिकेटच्या मैदानात पोहोचला. लहान असतानाच प्रियमच्या आईचं निधन झालं होतं. यानंतर वडिलांनीच प्रियमला लहानाचं मोठं केलं. प्रियमच्या वडिलांनी दूध आणि पेपर विकून, शाळेची गाडी चालवून मुलाचं स्वप्न पूर्ण केलं.
    Published by:Shreyas
    First published: