मुंबई, 20 जानेवारी : शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ही ओपनिंग जोडी लवकर 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमात दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्सची ही माजी जोडी कपिलच्या गुगलींचा या कार्यक्रमात सामना करेल. सोनी टीव्हीनं नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
कपिल शर्मानं या कार्यक्रमात शिखर आणि पृथ्वी सोबत चांगलीच मस्ती केल्याचं प्रोमोतून स्पष्ट होत आहे. कपिलने त्यांना मैदानातील आणि मैदानाच्या बाहेरील अनेक मजेदार प्रश्न विचारले आहेत. त्याला दोघांनी तितक्याच खेळकर पद्धतीने उत्तर दिले आहे. कपिलनं यावेळी विनोदी पद्धतीनं स्वागत करत शाळेला दांडी मारून एक दिवस या कर्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी झाल्याबद्दल पृथ्वीचे आभार देखील मानले.
कोरोनावर लस न घेता उपाय शोधणार जोकोविच, ब्रिटनमध्ये होणार ट्रायल
तुम्ही कधी विरोधी टीमची रणनीती ऐकण्याचा प्रयत्न केला आहे का? असा प्रश्न या कार्यक्रमात कपिलनं दोघांना विचारला. 'त्यावर मी एकदा ऐकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी गडबडीत मी गार्ड न घेताच बॅटींगला गेलो होतो, अशी आठवण पृथ्वीने सांगितली. त्याचबरोबर तुझी गर्लफ्रेंड आहे का?, असा प्रश्न कपिलने पृथ्वीला विचारताच त्याने जीभ चावून नाही, असे उत्तर दिले. पृथ्वीनं उत्तर सांगण्यापूर्वी जीभ चावल्याबद्दल कपिलने त्याची चांगलीच थट्टा केली. पृथ्वी आणि शिखरचा कपिल शर्माच्या कार्यक्रमातील हा प्रोमो व्हायरल झाला आहे.
पृथ्वी शॉ भारत विरुद्ध श्रीलंका दौऱ्यात शेवटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. त्याला दिल्ली कॅपिटल्सनं आगामी सिझनसाठी रिटेन केलेले आहे. तर शिखर धवन टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या अनुभवी खेळाडूनं पहिल्याच वन-डेमध्ये टीमकडून सर्वाधिक 79 रन काढले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.