Home /News /sport /

IPL 2021: 'ही' अभिनेत्री झाली पृथ्वी शॉ वर फिदा, नवी सुटकेस विकत घेण्याचा दिला सल्ला

IPL 2021: 'ही' अभिनेत्री झाली पृथ्वी शॉ वर फिदा, नवी सुटकेस विकत घेण्याचा दिला सल्ला

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचं नाव बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री प्राची सिंह (Prachi Singh) याच्याबरोबर जोडलं गेलं आहे.

    मुंबई, 1 मे : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचं नाव बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री प्राची सिंह  (Prachi Singh) याच्याबरोबर जोडलं गेलं आहे. पृथ्वी शॉच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्राची अनेकदा प्रतिक्रिया व्यक्त करत असते. प्राचीच्या या प्रतिक्रिया वाचल्यावर या दोघांमधील मैत्री अधिकच गाढ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्राचीनं नव्या प्रतिक्रियेमध्ये  ती पृथ्वीवर फिदा असल्याचे संकेत दिले आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. पृथ्वीनं कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 82 रनची जबरदस्त खेळी खेळली. त्यानंतर प्राचीनं पृथ्वीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला तिनं लव्ह इमोजी दिला असून मला तुझ्यावर गर्व आहे, असं कॅप्शन दिलं आहे. त्याचबरोबर प्राचीनं दुसऱ्या पोस्टमध्ये पृथ्वीला मिळालेल्या सर्व ट्रॉफींचा कोलाज शेअर केला असून त्याला हे सर्व पुरस्कार ठेवण्यासाठी नवी सुटकेस विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. पृथ्वी शॉने केकेआरविरुद्ध फक्त 41 बॉलमध्ये 82 रनची खेळी केली. त्यानं शिवम मावीच्या एकाच ओव्हरमध्ये सलग 6 फोर लगावले. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकाच ओव्हरमध्ये 6 फोर लगावणारा पृथ्वी हा अजिंक्य रहाणे नंतर दुसरा बॅट्समन आहे. IPL 2021: ऋतुराजच्या फोटोवर मराठी अभिनेत्री क्लीन बोल्ड कोण आहे प्राची सिंह? प्राची सिंह ही नवोदीत अभिनेत्री आहे. तिनं कलर्स टीव्हीवरील उडान या मालिकेत काम केलं आहे. प्राची मॉडल असून उत्तम डान्सर देखील आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं जुनं आहे. यापूर्वी देखील अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केलं आहे. या  परंपरेत पृथ्वी शॉचा देखील समावेश होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Instagram post, IPL 2021, PHOTOS VIRAL, Prithvi Shaw

    पुढील बातम्या