बंदीनंतर पृथ्वी शॉची लंडन टूर, 'हे' आहे कारण

बंदीनंतर पृथ्वी शॉची लंडन टूर, 'हे' आहे कारण

भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर 8 महिन्यांची बंदी घालण्यात आल्यानंतर तो इंग्लंडला गेला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉवर बीसीसीआयनं 8 महिन्यांची बंदी घातली आहे. पृथ्वीनं अजाणतेपणानं प्रतिबंधित पदार्थाचं सेवनं केलं होतं. सर्वसाधारण खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये आढळणाऱ्या पदार्थाचा अंश त्याच्या डोप चाचणीत आढळला होता. त्यानंतर पृथ्वीवर बंदीची कारवाई केली होती. यामुळं निराशेच्या गर्तेत सापडलेला पृथ्वी त्यातून सावरण्यासाठी इंग्लंडला गेला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार निलंबनाचा काळ पूर्ण होईपर्यंत पृथ्वी वादापासून दूर राहू इच्छित आहे. यासाठी त्यानं इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वीवर 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तो 15 सप्टेंबरपर्यंत सराव करू शकतो.

बंदीनंतर पृथ्वी शॉने इतर खेळाडूंनी यातून धडा घ्यावा असं म्हटलं होतं. पृथ्वी शॉने ट्विटरवरून स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने म्हटलं आहे की, एका कफ सिरपमधील असलेल्या पदार्थामुळे बंदी घालण्यात आली. हा कफ सिरप अजाणतेपणे घेतला होता. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवेळी सर्दी-खोकला झाला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना दुखापत झाली होती. त्यानंतर संघात पुनरागमन केलं होतं. पुन्हा आजारी पडू नये यासाठी औषध घेताना माझ्याकडून खबरदारी घेण्यात चूक झाली. आता जे झालं ते स्वीकारतो.

VIDEO: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात, औषधापासून खाद्यपदार्थापर्यंत सगळ्याची सोय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2019 02:46 PM IST

ताज्या बातम्या